"सह्याद्री" निवडणुकीत सभासदांनी सहकार्य करावे......सर्वसंमतीने प्रत्येक गटातून उमेदवार दयावा......सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन


"सह्याद्री" निवडणुकीत सभासदांनी सहकार्य करावे......सर्वसंमतीने प्रत्येक गटातून उमेदवार दयावा......सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन


कराड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी सहकार्य करावे आणि सर्वसंमतीने प्रत्येक गटातून उमेदवार दयावा असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील केले आहे.


 तांबवे (ता कराड) येथील लक्ष्मीपुत्र कार्यालयात सभासदांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, देवराजदादा पाटील, माणिक पाटील, निवास पाटील, राहुल पाटील, सुरेश माने, हणमंत चव्हाण, पांडुरंग चव्हाण, सरपंच जावेद मुल्ला, विश्वास निकम, मोहम्मद आवटे, श्रीकांत बादल, आर. वाय. नलवडे, डॉ. बलराज पाटील विजय चव्हाण उपस्थित होते.


सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सभासद केंद्रबिंदू मानून करीत आहोत. विश्वस्त या भावनेने प्रत्येक सभासदाला न्याय देण्याची भूमिका आहे. "सह्याद्री" ऊस उत्पादक सभासदांना सर्वाधिक दर देत असतो असे सांगून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याचा आतापर्यंतचे इतिहास सभासदांचे ठेवला.महाविकास आघाडीने सरकारने महात्मा फुले यांच्या नावे थकित शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंत कर्जमाफी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली.दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली त्यांच्यासाठी शासन निर्णय घेणार असल्याचे सांगून सहकारमंत्री पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादासाहेब भिसे यांची कमिटी करण्यात आली आहे. ही कमिटी चर्चा करून निर्णय घेईल.


यावेळी निवास पाटील, मानसिंग जगदाळे, देवराज पाटील, विश्वास निकम, प्रकाश पाटील, हणमंत चव्हाण, यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक एच.डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिंदे यांनी केले तर महंमद आवटे यांनी आभार मानले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image