कराडमध्ये मटन विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

कराडमध्ये मटन विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल


कराड - लॉकडाऊनमुळे सर्व निशब्द आहे. सर्वत्र नीरव शांतता आहे. कोणीही घराबाहेर पडत नाही. दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून सर्वत्र बंद असल्यामुळे मांसाहार करणाऱ्यांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी मांसाहार विक्रेत्यांनी मांस विकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय (सातारा) यांनी कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून मटन विक्रीची बंदी असताना छुप्या पद्धतीने मटण विक्री केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी मटण विक्री मालक व कामगार यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ही घटना रविवारी सकाळी 10.45 वा. घडली. याबाबत आरोग्य कर्मचारी नगरपालिका यांनी शहर पोलिसाद फिर्याद दिली आहे. मालक जुनेद मुल्ला मटन विक्रेता व कामगार मोबीन निसार कुरेशी (दोन्ही रा. भाजीमंडई गुरूवार पेठ, कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.


 


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश