एका मुलीच्या दोन झाल्या !

हेडिंग वाचून लेख वाचायला सुरुवात केला असेल, सांगण्याचा मुद्दा असा आहे की, जीवनात प्रत्येकाच्या सुखदुःखाचे चढ-उताराचे प्रसंग येत असतात. मात्र दुःखाच्या प्रसंग उगळत बसण्यापेक्षा जीवनातील आनंदाचे क्षण उपभोगायला हवेत. एका मुलीच्या दोन झाल्या. हे थोडंसं कसंस वाटतंय ना. मुद्दा आता आपणाला सांगावयास हवा, याची उत्सुकता अधिक वाढवण्यात काही अर्थ नाही.

15 जून हा दिवस माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा आहे. कारण याच दिवशी मला पहिली मुलगी झाली. ती म्हणजे स्नेहल आज या मुलीने आपल्या कार्यकर्तुत्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. वास्तविक मुलगी का मुलगा असा जीवनामध्ये कधीच भेदभाव केला नाही आणि आजही करत नाही. मुलगी झाल्यानंतर मला जीवनातला सर्वोच्च आनंद झाला होता. कारण स्नेहल ही माझ्या जीवनातील पहिले आपत्य आहे. स्नेहलने आतापर्यंत माझ्या जीवनात नेहमीच आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यापासूनच स्नेहल शांत स्वभावाची. कधीही कोणत्याही बाबतीत घाई गडबड केली नाही. एखादा निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक व कोणाचेही मन दुखावणार नाही याची दक्षता, काळजी घेणारी स्नेहल. आज माझ्यापासून दूर अंतरावर राहत आहे. स्नेहलने नेहमीच जीवनात निर्णय घेताना मग ते शिक्षणाचे असतील अथवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याचे असतील. विशेषता जीवनाचा जोडीदार शोधतानाही तिने स्वतः निर्णय घेतला आहे. या सर्व निर्णयाला मी व माझी पत्नी शुभांगी आम्ही दोघांनी संमती दिली आहे. आणि आज स्नेहल कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करीत आहे. याचा तिला मोबदलाही अत्यंत चांगला व तिच्या योग्यतेप्रमाणे मिळतो आहे. असे मला स्वाभिमानाने, अभिमानाने नमूद करावेसे वाटते आहे.

स्नेहलने आम्हा आई / बाप म्हणून उभयतांना नेहमीच समजून घेण्याची भूमिका घेतली आहे. कधी कधी वाटते उगाच स्नेहल आमच्यापासून दूर अंतरावर राहणेस गेली. कारण लग्नानंतर प्रत्येक मुलीला माहेर सोडून सासरला जावे लागते. त्याप्रमाणे स्नेहल कराड सोडून ठाणे येथे कायमस्वरूपी रहिवासी झाली आहे. स्नेहलचा सखा सोबती म्हणजे स्नेहलचा पती रोहन ही अतिशय शांत व हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारा जावई मिळाला आहे. याचाही आनंद निश्चितपणे होत आहे. कारण मुलीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद म्हणजे तिला मनाजोगा जोडीदार मिळालेला सोबती आहे.

15 जून हा स्नेहलचा वाढदिवस.  हा आनंदाचा क्षण. मी विसरता उपयोगाचा नाही. दरम्यान माझ्या विसरभोळ्या स्वभावामुळे मी तिचा आजचा वाढदिवस विसरलो. शक्यतो कोणाचाही वाढदिवस कधी लक्षात ठेवत नाही. आणि फारसे गांभीर्याने घेत नाही. यामुळे स्नेहलचा वाढदिवस विसरलो असेन. याच दिवसाचा माझ्या जीवनातले सर्वोच्च आनंदाचा क्षणही आहे. आजचा दिवस आठवला की मन सदगतीत होते. पुन्हा एकदा मन प्रफुल्लित होऊन आनंदी होत राहते. स्नेहलला आरोग्यदायी, सुख समृद्धी लाभो ही सदिच्छा आहेच.



मुलीला मुलगी झाली म्हणजे स्नेहलला "कायरा" झाली आणि कायरा माझ्या जीवनातील आनंद देणारी नात आहे. माझ्या जीवनामध्ये तीन अपत्य. त्यापैकी स्नेहल, सायली आणि उत्कर्ष. स्नेहलला  "कायदा" सायलीला दोन अपत्य. दोन्हीही मुले. शुभायु आणि राघवेंद्र.  तिन्ही नातवांपैकी कायरा मला फक्त एकेरीत बोलते. आणि एकेरीत बोलणे हे मला प्रभावित करणारे आहे. कारण मला आतापर्यंत कोणीही फारसे एकेरीत बोललेले नाही. यामुळे कायराचा नेहमीच मला हेवा वाटतो. म्हणूनच एका मुलीच्या दोन झाल्या. असे हेडिंग टाकून हे मनोगत व्यक्त केले आहे. पुन्हा एकदा स्नेहलला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

गोरख तावरे