हसतमुख व्यक्तिमत्व रंगराव शिंपुकडेसाहेब
माजी माहिती अधिकारी रंगराव शिंपूकडेसाहेब यांचा आज वाढदिवस. रंगराव शिंपूकडेसाहेब हे स्वभावणे अतिशय शांत, संयमी, मृदू भाषिक म्हणून सर्वांना परिचित आहेत. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर नवीन साप्ताहिक, दैनिक यांना शासनमान्य यादीमध्ये समावेश करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन काम केले आहे. दैनिक आणि साप्ताहिकांना शासकीय जाहिराती सुरू कराव्यात, यासाठी अनेकांना सहकार्य, मदत व मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच निवृत्तीनंतरही रंगराव शिंपूकडेसाहेब हे अतिशय समाधानाने आपले जीवन जगताहेत. कोणताही ताणतणाव त्यांच्याकडे जाणवत नाही. सदा सर्वदा हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून रंगराव शिंपूकडेसाहेब हे व्यक्तिमत्व आहे.असेच दिसत आहेत. (आदरणीय शिंपुकडेसाहेब यांचा मोबाईल नंबर - 9326063606)

प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अनेकांना आपल्याला मिळालेला वेळ कसा व्यथीत करायचा ? असा प्रश्न पडलेला असतो. दरम्यान माहिती अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर रंगराव शिंपूकडेसाहेब हे अनेक कामात व्यस्त झाले आहेत. मग ज्येष्ठ नागरिक संघ असो. असोसिएशन स्मॉल अँड मिडीम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटना असेल. माजी आमदार शरद पाटील यांनी चालवलेल्या वृद्धसेवा आश्रमासाठी आपला अमूल्य वेळ खर्ची करतात. या आश्रमातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. न चुकता दररोज या आश्रमामध्ये एकदा तरी ते भेट देतातच. सांगलीमध्ये लहान मोठ्या कार्यक्रमात नेहमीच ते सक्रिय असतात. आपला वेळ इतरांच्यासाठी सत्कारणी खर्ची करण्याची मनोवृत्ती रंगराव शिपकडे साहेबांची असल्यामुळे कोणालाही कोणत्याही कामासाठी ते "नाही" हा शब्द वापरत नाहीत विशेष म्हणजे कोणतेही काम असेल आणि चला शिंपूकडेसाहेब कामासाठी म्हटले की, ते लगेच तत्परच असतात.

"सुखी माणसाचा सदरा" अशी कथा आहे. वास्तविक पाहता सुख, समाधान, ऐश्वर्य हे मानण्यावर आहे किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो. याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो. त्यावर हे सर्व सुख अवलंबून आहे. वास्तविक पाहता रंगराव शिंपूकडेसाहेब यांच्याशी संवाद साधताना अभ्यासपूर्ण माहिती आणि शासकीय कामांची सोपी पद्धत समजते. मी स्वतः आप्पासाहेब पाटील आणि शिंपूकडेसाहेब अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो आहोत. हा अनुभव तर अतिशय सकारात्मक, चांगला व उत्साहवर्धक आहे. शिंपूकडेसाहेब यांच्याशी मैत्रीचा ऋणानुबंध निर्माण झाल्यानंतर अनेक विषयावर त्यांच्याशी गप्पाटप्पांची मैफल रंगतदार होत असते. विशेष म्हणजे रंगराव शिंपूकडेसाहेब हे मैत्रीला व शब्दाला पक्के व प्रामाणिक असतात. मैत्रीसाठी वयाची अट त्यांना लागू होत नाही. स्वभाव शांत आणि बोलणे मृदू असल्यामुळे अनेकांना शिंपूकडे साहेबांचे व्यक्तिमत्व आकर्षित करीत असते. आपण वयोवृद्ध झालो आहोत. म्हणजेच म्हातारे झालोत. ही मुळात कल्पनाच ते करीत नाहीत. सदा सर्वदा हसतमुख राहायचे. कामांमध्ये व्यस्त राहायचे. समवयस्कर असो किंवा कोणत्याही वयोगटातील मित्रांबरोबर गप्पांची मैफल रंगवायची. हेच त्यांच्या सुखी जीवनाचा मंत्र आणि तंत्र आहे.

रंगराव शिंपूकडे आणि आप्पासाहेब पाटील हे दोन ज्येष्ठ. सध्या महाराष्ट्रातील पत्रकारांना, संपादकांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर प्रत्येक वृत्तपत्राची निकोप वाढ झाली पाहिजे. वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती मिळाल्या पाहिजेत. पत्रकार आणि संपादकांना सुलभरित्या अधिस्वीकृती पत्रिका मिळाली पाहिजे. ज्येष्ठ संपादकांना सन्मान योजनेतून लाभ मिळाला पाहिजे‌. यासाठी सांगलीतील हे दोन "ज्येष्ठ"कशाचीही तमा व फिकीर न करता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. रंगराव शिंपूकडेसाहेब आणि आप्पासाहेब पाटील यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचे प्रश्न, पत्रकार व संपादकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी हाती घेतलेले काम मार्गी लागलेले आहेत. त्यांच्या कामाला बहुतांश यश प्राप्त झालेले आहे. आज रंगराव शिंपूकडे यांचा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्याबद्दल हे कौतुकपर अनुभवाचे मनोगत व्यक्त करताना अभिमान वाटत आहे. रंगराव शिंपुकडेसाहेब यांना मनःपूर्वक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा.

गोरख तावरे, कराड
9326711721 / 9616111711