स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, अन्यथा घंटानाद आंदोलन करणार.....शिवसेनेची निवेदनाद्वारे इशारा

कराड - कराड मधीलस्मशानभमीच्या देखभालीकडे कराड नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. बहुतांश शेडमधील दहन करण्याचे लोखंडी स्टॅण्ड तुटलेले असून त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच स्टॅण्ड खालील कोबा व फरशी निखळलेली आहे. यामुळे अग्नी देण्यासाठी लाकडे रचताना कसरत करावी लागते.याची दखल घेऊन कराड नगरपरिषदेने उपाययोजना करून अंमलबजावणी करावी. अन्यथा कराड नगरपालिके समोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनेतर्फे देण्यात आलेला आहे. उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्याकडे शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.


स्मशानभूमीतील अंतिम अग्नी विधीसाठी लाकडे व्यवस्थितरित्या रचता येत नाहीत. यामुळे दहन विधीच्या कार्यक्रमात अडथळा येत आहे. तसेच रक्षा विसर्जनाच्या दिवशी सदर लोखंडी स्टॅण्ड खालील फरशी कॉक्रीटचा कोबा खचल्यामुळे रक्षा गोळा करण्यास अडचणी येत आहेत. स्मशानभूमीच्या परिसरातील स्वच्छता नसते आणि अस्ताव्यस्त पडलेले मटेरिअल याबाबत ही नगरपरिषदेचे दुर्लक्ष आहे. नगरपालिकने स्वच्छता अभियानात आघाडी घेतली आहे ही बाब अभिमानास्पद आहे. परंतु अंत्यविधीचे ठिकाण अस्वच्छता व दुरावस्था असल्याचे आढळून येत आहे. ही बाब अभिमानास्पद नाही.असे मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


या विषयी गांर्भीयपूर्वक लक्ष घालून त्वरीत स्मशानभूमीतील लोखंडी स्टॅण्ड फ्लोरिंग आणि स्वच्छते बाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे दरम्यान यशवंतराव चव्हाण स्मृती साधनातील कलादालन कराड शहर व परिसरातील कलाकार मंडळींसाठी कलाकौशल्य दाखवण्याकरिता राखीव असताना सदर कलादालन सातत्याने व्यवसायिक कारणासाठी भाड्याने वर्षभर दिले जाते. यामुळे कलाकारांना आपले कलाप्रदर्शन सदर ठिकाणी करता येत नाही. तरी इथून पुढे सदर कलादालन कलाकारणांकरिता राखून ठेवण्यात यावे, अशीही मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.


शिवसेना सातारा जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, कराड तालुका दक्षिण प्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, कराड शहर प्रमुख शिराज करपे, कराड शहर उपप्रमुख अक्षय गवळी, कराड तालुका उपप्रमुख काकासाहेब जाधव, संजय चव्हाण,दिलीप यादव, सातारा जिल्हा संघटिका अनिताताई जाधव, कराड उपशहर प्रमुख शेखर बर्गे,साजिद मुजावर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, प्रसिद्धीप्रमुख अजित पुरोहित, संभाजी जगताप यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image