कराडमधून हिंगणघाट आरोपीला फाशीची मागणी
कराड - कराड तहसील कार्यालय येथे हिंगणघाट घटनेचा निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची लेखी मागणी निवासी नायब तहसिलदार राजेंद्र तांबे यांना कराडातील विविध सामाजिक संस्था व संघटनेच्या माध्यमातून केली गेली आहे.
महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा बसण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशी मागणी करत विविध संघटनेचे कार्यकर्ते व महिला एकत्र आले होते. यावेळी स्वाती पिसाळ म्हणाल्या की, तेलंगणा सरकारने पिडीतेला तात्काळ जो न्याय दिला तसाच न्याय हिंगणघाट पिडीतेला लवकर मिळाला पाहिजे. म्हणजे पुन्हा असे धाडस कोणी करणार नाही तसेच अनिता जाधव, राजेंद्र माने, अनिल घराळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी घोषणा देवून आरोपिचा धिक्कार करण्यात आला.
यावेळी वनिता मोरे, मनिषा जाधव, मराठा मोर्चाच्या स्वाती पिसाळ, पुनम डाळे,शिवसेना महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव, मयुरी मोरे, सविता पवार, वेदिका जाधव, सुनिता कांबळे, वैशाली मोरे, सुरेखा सरदार, तमन्ना शेख, सुवर्णां पाटील, मनसे तालुका अध्यक्ष दादा शिंगण,ग्राहक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र माने, मराठा मोर्चाचे अनिल घराळ, वाहतूक सेनेचे संघटक ज्ञानदेव भोसले,उपाध्यक्ष दशरथ धोत्रे,शिवसेना उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील, सुहास पाटील,छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर साळुंखे,शेतकरी संघटनेचे साजिद मुल्ला,दिलीप पवार तसेच महिला मोठा संख्येने उपस्थित होत्या.