सदाशिवगड येथे दुर्ग पूजन


सदाशिवगड येथे दुर्ग पूजन


कराड - किल्ले सदाशिवगड (ता. कराड, सातारा) संवर्धनासाठी सन 2008 पासून श्री सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान कार्यरत आहे. गडावर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने गडाखालून गडावर पाणी नेण्यासाठी 23 रूपये लोकवर्गणी गोळा करत शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्यातील पहिली महत्त्वकांक्षी पाणी योजना साकारण्यात सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला यश आले आहे.


"एकच ध्यास, किल्ले सदाशिवगड विकास" हे ब्रीद घेऊन_कार्यरत असणाऱ्या श्री सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून किल्ले सदाशिवगड येथे दुर्ग पूजन करण्यात आले. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री. डॉ. सुभाष एरम, सौ. रश्मी एरम (वहिनी), सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या कराडमधील शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे सदस्य, गडप्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत दुर्ग पूजन संपन्न झाले.