नटराज मंदिरातील महाशिवरात्री रुद्राची पूर्णाहूती संपन्न . पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांची मंदिरास भेट महाकाय शिवलिंग पहाण्यासाठी सातारकरांची अलोट गर्दी.

मंदिरातील महाशिवरात्री रुद्राची पूर्णाहूती संपन्न ...पो...प्रमुख तेजस्वी सातपुते यांची मंदिरास भेट.....महाकाय शिवलिंग पहाण्यासाठी सातारकरांची अलोट गर्दी

 

सातारा- श्री आनंद नटराज व श्री शिवकामसुंदरी देवतांच्या कृपेने व कांची कामकोटी पीठाचे परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी, पीठाधिपती परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या आशिर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरु असलेल्या  विविध वैदिक व धार्मिक कार्यक्रमांची सांगता आज दुपारी पूर्णाहतीने करण्यात आली. आज सकाळी साडेसात पासून सुरु झालेल्या  लोककल्याणकारी,रोगनिवारक,पापनाश तसेच सुख,शांती व समृध्दि देणार्‍या रूद्राचे अनुष्ठानात ब्राह्मणांकडून  रुद्राची आवर्तने करत हवनकुडांत समीधा व आहूति देण्यात आल्या. तसेच या हवनाची सांगता उमामहेश्‍वर पाठशाळेचे प्रमुख  वेदमूर्ती दत्तात्रय रमाकांत जोशी यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.मंदिरातील मूलनाथेश्‍वरास महाशिवरात्री निमित्त विशेष पुजा करुन फुलांची सजावट करण्यात आली होती. 

 

 या महारुद्र अनुष्ठानात महाआरतीचे नंतर 4 वेदांचे सेवा, अष्टावधान सेवा, अभिषेक संपन्न झाला. पूर्णाहूती नंतर  महामंगलआरती, श्री मुलनाथेश्वर पिंडीस महारूद्र कलश महाभिषेक, लघुरुद्र तसेच रात्री 8 ते 12 या वेळेत श्री नटराज पाचू पिंडीस कलशाभिषेक करण्यात आला.

 

 मूलनाथेश्‍वरास कलाभिषेक घालण्यापूर्वी सर्व ब्रह्मवृंदांनी या पूचन केलल्या कलाशाची शंखध्वनी आणि वाद्यांच्या गजरात मंदीराचे प्रांगणात मिरवणुक काढली होती.व हे वेदमंत्रांनी सिध्द केलल्या जलाचा अभिषेक हरहर महादेव च्या जयघोंषात मूलनाथेश्‍वराला घालण्यात आला.हा अभिषेक पहाण्यासाटी भक्तांनी अलोट गर्दीं केली होती. दरम्यान सातारच्या जिल्हा पोलीस प्रमुख सौ. तेजस्वी सातपुते यांनी मंदिरास सदिच्छा भेट दिली, यावेळी मंदिराचे व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग यांनी मंदिराच्या वैशिष्ठंयाबदद्ल त्यांना सविस्तर माहिती दिली. सौ.आंचल घोरपडे यांनी सातपुते यांचा शाल, प्रसाद देउन सत्कार केला. 

 

यावेळी मंदिराचे  व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उषा शानभाग,विश्‍वस्त मुकुंद मोघे,रणजीत सावंत,नारायण राव, वासुदेवन नायर, व्यवस्थापक चंद्रन, राहूल घायताडे, सौ. कांचन शहाणे,रमेश हलगेकर,वेदमूर्ती जगदिश भट गुरुजी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आरतीचा व रुद्र पुजनाचा लाभ घेतला,यावेळी . या धार्मीक महारुद्र कार्यक्रमात सातारा येथील वेदमूर्ती जोशी यांचेसह माधव भिडे, नचिकेत भिडे, रोहीत आपटे, श्रीयश भिसे, शशांक जोशी, संकेत पुजारी, आदित्य कुलकर्णी, यशोधन जोशी, कुलकर्णी   ब्रह्मवृंद सहभागी झाले होते.  महाशिवरात्री निमित्त मंदिराचे परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराचे प्रांगणात उभारेलल्या भव्य मंडपात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. तसेच नटराज दर्शंनासाठी भावीकांनी दिवस रात्र उशीरापयंर्र्ंत रांगा लावल्या होत्या. संपूर्ण नटराज मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली  आहे तसेच गोपुरावर टाकलेल्या सातरंगी आकर्शक एलईडी झोतामुळे मंदिराचे वैभव अधिकच खुलून दिसत होते. 


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image