22 मार्च रोजी तीन मंत्र्याच्या सत्काराचे आयोजन घोणशी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा

22 मार्च रोजी तीन मंत्र्याच्या सत्काराचे आयोजन
घोणशी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा


कराड - घोणशी (ता.कराड) येथे रविवारी 22 मार्च रोजी सायंकाळी ५वाजता राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई, राज्यमंत्री नामदार विश्वजीत कदम या तीन मंत्र्यांचा जाहीर सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील यांनी दिली.


खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार आहे. यासाठी आमदार मकरंद पाटील, आ.दीपक चव्हाण,आ. विक्रम सावंत,आ. मोहनशेठ कदम यांच्यासह माजी मंत्री शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, पाटणचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या उपस्थिती आणि सह्याद्री साखर कारखानाचे संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक माणिकराव पाटील यांनी केले आहे.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image