महाबळेश्वर व पाचगणी हद्दीतील अनिवासी, स्थानिक नसलेल्या व्यक्तींनी 23 मार्च पर्यंत सातारा जिल्हा सोडावा

महाबळेश्वर व पाचगणी हद्दीतील अनिवासी, स्थानिक नसलेल्या व्यक्तींनी 23 मार्च पर्यंत सातारा जिल्हा सोडावा


 कराड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदी नुसार महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद आणि पाचगणी नगरपरिषद तसेच दांडेघर, ताईघाट, अंजुमन, नंदनवन, मीठा इस्टेट, भिलार, भोसे, पांगारी, गुरेघर, बोंडारवाडी, अवकाळी, मेटगुताड, लिंगमळा, नाकिंदा, क्षेत्र महाबळेश्वर, मेटतळे, माचुतर, भेकवली, भालगी, मोळेश्वर, कासवंड, देवळी, तापोळा, खिंगर या ठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यक्तिंना दि. 23 मार्च 2020 रोजीच्या दुपारी 12 वाजलेनंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 नुसार खालीलप्रमाणे आदेश करीत आहे.


दि. 23 मार्च 2020 रोजीच्या दुपारी 12 च्या नंतर मुळ मालक व त्यांचे कुटुंबीय (यामध्ये आई,वडील, पत्नी व मुलं) यांचेव्यतिरीक्त अन्य व्यक्तिंना सदर ठिकाणी वास्तव्य करण्यास मनाई करीत आहे. या व्यक्तिंनी दि. 23 मार्च रोजीच्या दुपारी 12 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राबाहेर जायचे  आहे. या व्यक्तिंना 23 मार्च रोजीच्या दुपारी 12 वाजेपर्यंत इतर कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात येण्यास मनाई करीत आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करण्यास मनाई करीत आहे.  सदर व्यक्ती वर नमुद केलेल्या ठिकाणी खाजगी बंगल्यामध्ये वास्तव्यास असलेस व्यक्तींनी त्यांचे मुळ गांवी वास्तव्यास जायचे आहे. अनिवासी तसेच स्थानिक नसलेल्या सर्व व्यक्तींनी (नोकरी निमित्त वास्तव्य करीत असलेल्या  कर्मचारी, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये  मागील तीन महिन्या पुर्वीपासुन कार्यरत असलेले कर्मचारी वगळून) या ठिकाणी वास्तव्य करणेस मनाई करीत आहे.