मराठी भाषेचा अभिमान असणे आवश्यक : डॉ.जी.एस.झुळझुळे


मराठी भाषेचा अभिमान असणे आवश्यक : डॉ.जी.एस.झुळझुळे


कोयनानगर- प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान असायला हवा तसेच आपल्या वागण्या बोलण्यातून मराठी बाणा जपला तरच मराठी भाषेचा प्रसार व प्रचार होईल असे मत कला व वाणिज्य महाविद्यालय कोयनानगर चे प्राचार्य डॉ.जी.एस.झुळझुळे यांनी व्यक्त केले.


कोयनानगर याठिकाणी कला व वाणिज्य महाविद्यालय कोयनानगर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पाटण यांच्यावतीने मराठी राजभाषा दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक आनंदराव देसाई हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जी.एस.झुळझुळे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा.वैशाली पाटील, वाड्मय मंडळ निमंत्रक प्रा. शीतल खैरमोडे या उपस्थित होत्या.


कार्यक्रमाची सुरुवात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला प्रा.वैशाली पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मराठी राजभाषा दिनाची माहिती सांगितली यानंतर काव्यवाचनाचाकार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या सामाजिक, निसर्ग काही प्रेमकविता सादर केल्या यावेळी महाविद्यालयातील काही प्राध्यापकानी ही आपल्या कविता सादर करून कार्यक्रमामध्ये रंगत भरली.


प्रमुख पाहुणे आनंदराव देसाई यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी भाषेचा भाषा हे व्यवहाराचे साधन असून भाषेवर प्रभुत्व असेल तर आपले विचार मांडणे सोपे जाते मातृभाषेतून आपल्याला चांगल्या प्रकारे व्यक्त होता येते.मराठी भाषेचा ज्ञानभाषे सारखा उपयोग केला पाहिजे.मातृभाषेतून शिक्षण घेतले तर संकल्पना लवकर स्पष्ट होतात असे मत त्यांनी व्यक्त केले तर आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ.जी.एस.झुळझुळे म्हणाले की जगात प्रत्येक जण जसा भाषेचा अभिमान बाळगतो तसाच आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे.जगात बोलल्या जाणाऱ्या सुमारे 5500 भाषेमद्ये मराठी भाषेचा समावेश आहे.रशिया, आस्ट्रेलिया सह अनेक देशांमध्ये जवळपास 44 मराठी रेडिओ केंद्र आहेत. मराठी राजभाषा दिन आता जागतिक मराठी दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे मराठी भाषेची व्याप्ती वाढत आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.अमोल माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्मिता कदम, प्रा. गजाला तांबोळी यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते