कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालयास कोविड-19 चाचणी करण्यास  मान्यता


कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालयास कोविड-19 चाचणी करण्यास  मान्यता


कराड :  कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालय, कराड यांना कोविड-19 चाचणीसाठी ऑल इंडिया इन्सिट्यूट मेडिकल सायन्सेस, यांच्याकडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करुन ही साखळी तोडणे अधिक महत्वाचे असते, त्या दृष्टीने कराड मध्ये चाचणीला मान्यता मिळणे हे जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे. येत्या काही दिवसात  इथेच चाचण्या होतील, त्यामुळे पुण्याला जाण्याचा तिथे गेल्यानंतरची थोडी प्रतिक्षा हा वेळेचा अपव्यय टाळता येईल आणि लवकरात लवकर अहवाल आपल्या हाती येईल, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.