आरोग्य कर्मचाऱ्याचा रिपोर्टही आला निगेटिव्ह ; एक महिला रात्री विलगीकरण कक्षात दाखल

आरोग्य कर्मचाऱ्याचा रिपोर्टही आला निगेटिव्ह ;
एक महिला रात्री विलगीकरण कक्षात दाखल


सातारा :  काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या " त्या " आरोग्य कर्मचाऱ्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. काल पर्यंत अनुमानित म्हणून दाखल केलेले  दहाजणही निगेटिव्ह आले आहेत. दुबई येथून आलेल्या  45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा  अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी आज सकाळी दिली.


बहामा,  दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे  आलेला 27 वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र वय 24 वर्षे  त्या दोघांनाही  सर्दी व  खोकला असल्याने त्यांना दि. 21 मार्च रोजी  रात्री 11 वा. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेला 24 वर्षीय युवक त्याला घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री  1 वा. विलगीकरण कक्षात दाखल केले होते. यापूर्वी चिली येथून आलेल्या 24 वर्षीय युवकास व  दुबई येथून आलेल्या 29 वर्षीय युवकास  दाखल करण्यात आले होते.


काल एका आरोग्य कर्मचाऱ्याला काही लक्षणांमुळे आज अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. रात्री दाखल केलेल्या  या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय.  व्ही. कडे पाठवला आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image