नूतन संचालक मंडळ अजिंक्यतारा सूत गिरणीचा नावलौकिक वाढवेल.....आ. शिवेंद्रसिंहराजे.....चेअरमनपदी नावडकर तर, महाडिक व्हा. चेअरमन

नूतन संचालक मंडळ अजिंक्यतारा सूत गिरणीचा नावलौकिक वाढवेल.....आ. शिवेंद्रसिंहराजे.....चेअरमनपदी नावडकर तर, महाडिक व्हा. चेअरमन


सातारा- अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे सूताला देशासह परदेशी बाजारपेठेत मागणी वाढली आहे. सूत गिरणीचे कामकाज आदर्शवत सुरु असून स्व. भाऊसाहेब महाराजांचे उच्चतम प्रतिच्या सूत उत्पादनाचे स्वप्न सत्यात उतरले आहे. सूत गिरणीच्या संचालक मंडळची निवडणूक बिनविरोध पार पडली असून नूतन पदाधिकारी सूत गिरणीचा नावलौकिक वाढवतील, असा विश्‍वास सूत गिरणीचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.


वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गिरणीच्या चेअरमनपदी उत्तमराव विठोबा नावडकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी बापूराव कृष्णा महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यांत आली. नवनिर्वाचित संचालकांमधून चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी सूत गिरणीच्या कार्यालयामध्ये अध्यासी अधिकारी बी. एम. तावरे, निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांचे अध्यक्षतेखाली निवडूक प्रकि‘या पार पडली. निवडीनंतर संस्थेचे मार्गदर्शक संचालक आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हा. चेअरमन तसेच नवनिर्वाचित संचालक यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


संस्थेच्या चेअरमनपदासाठी नावडकर यांचे नाव जगन्नाथ हणमंत किर्दत यांनी सुचविले तर अनुमोदन अजित सदाशिव साळुंखे यांनी दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी महाडिक यांचे नाव अशोक रामचंद्र काठाळे यांनी सुचविले तर अनुमोदन सौ. रत्नमाला अंकुश डांगे यांनी दिले. विहीत मुदतीत इतर कोणाचेही अर्ज दाखल न झालेने अध्यासी अधिकारी यांनी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या संचालकपदी अजित साळुंखे, नागठाणे, अशोक कदम, तुकाईवाडी, बळिराम देशमुख-कारंडवाडी, भरत कदम-वळसे, हणमंत देवरे-सातारा, आबासो साबळे-वडुथ, जगन्नाथ किर्दत-करंजे सातारा, भरत मतकर-नागेवाडी, अशोक काठाळे-परळी, भगवान शेडगे-गडकर आळी सातारा, उल्हास भोसले-सातारा, सुनिल देशमुख-सातारा, गणपतराव मोहिते-सातारा, सौ. साधना ङ्गडतरे-जिहे, सौ. रत्नमाला डांगे-सासपडे, रघुनाथ जाधव-शेंद्रे, सुरेश टिळेकर-किडगांव, सचिन गायकवाड-कोडोली यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद चतुर व खोत उपस्थित होते.
 


 

Popular posts
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image