कराडमध्ये कोणीही पॉझिटिव्ह नाही ; अफवांवर विश्वास ठेवू नका


कराडमध्ये कोणीही पॉझिटिव्ह नाही ; अफवांवर विश्वास ठेवू नका


कराड - कराड शहरामध्ये कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण नाही तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर आतापर्यंत सातारा जिल्ह्यात तीन पेक्षा अधिक जणांवर कारवाई केली आहे. याबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही तात्काळ कारवाई होईल असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.


कोरोना व्हायरसबाबत जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह मीडियाला माहिती देतात व तिथून ती जनतेपर्यंत पोचविली जाते. दरम्यान कोणीही सोशल मीडियाचा गैरवापर करून कृपया अफवा पसरवू नयेत‌. जर अफवा पसरवली गेली तर मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.सध्याची परिस्थिती पाहता वास्तविक लोकांमध्ये भय निर्माण होईल अथवा चुकीची माहिती जाईल, अशा चुकीच्या पोस्ट न करणे हे जनहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हा प्रशासन सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी करीत असून प्रत्येक नागरिकाला कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.


जिल्हा प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती सातारा जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अधिकृतपणे प्रसारित केली जाते. सदची माहिती बिनचूक व खात्रीलायक असल्याने अशा पोस्ट फॉरवर्ड करणे योग्य ठरेल मात्र आपल्या मनाचा कोणताही कारभार अथवा अतिशहाणपणा न करणे हे लोकांच्या हिताचे आहे.संचारबंदीच्या काळात शासन व जिल्हा प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे हे सर्वांच्या दृष्टीने हिताचे आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या घरात राहावे, घराबाहेर पडू नये ही सूचना 100% पाळली तर कोरोना व्हायरसवर आपण निश्चित मात करू शकतो.