गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी वाय पल्सची सुरक्षा केली कमी...शासकीय ताफयामध्ये चार पैकी एकच गाडी सुरक्षेसाठी तैनात


गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी वाय पल्सची सुरक्षा केली कमी...शासकीय ताफयामध्ये चार पैकी एकच गाडी सुरक्षेसाठी तैनात


कराड - कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संपुर्ण राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होवू नये याकरीता संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे.सोमवारी मुख्यमंत्री यांनी संचारबंदीचा निर्णय जाहीर करताच राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना राज्याकडून पुरविण्यात आलेल्या वाय पल्सच्या सुरक्षेमधील विशेष सुरक्षा गटाची तसेच अंगरक्षांची सुरक्षा कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला व आपल्या सुरक्षेकरीता तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्ताकरीता तैनात करणेकरीता पाठवून दिली आहे.त्यांच्या शासकीय ताफयामध्ये सध्या चार गाडयांपैकी केवळ एकच गाडीतील पोलीस यंत्रणा त्यांनी सुरक्षेकरीता बरोबर ठेवली आहे.ना.शंभूराज देसाईंच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


                  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना आजाराच्या संदर्भात दक्षता व काळजी घेणेकरीता सर्वच स्तरावरुन कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर याचा जादा प्रमाणात राज्यामध्ये फैलाव होवू नये याकरीता जे जे निर्णय घेणे आवश्यक आहेत ते ते निर्णय राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे घेत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून जनतेने मोठया प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येवू नये यासाठी संपुर्ण राज्यामध्ये संचारबंदी व जमावबंदी करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री यांनी सोमवारी दि.२३ रोजी दुपारी जाहीर केला.


                 दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना गृहराज्यमंत्री म्हणून त्यांच्या सुरक्षेकरीता राज्य शासनाने वाय पल्स ही सुरक्षा तैनात केली आहे.यामध्ये वाय पल्सच्या सुरक्षेमधील मुंबई तसेच पुणे येथील विशेष सुरक्षा गटाचे पथक तैनात करण्यात आले आहे तर त्यांना वाय पल्स सुरक्षा असल्याने त्यांच्या शासकीय ताफयामध्ये पायलट व एसस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संचारबंदीचा व जमावबंदीचा निर्णय सोमवारी दि.२३ रोजी जाहीर करताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांना पुरविण्यात आलेली वाय पल्स सुरक्षेमधील विशेष सुरक्षा गटातील पोलीस यंत्रणा तसेच त्यांच्या सोबत शासकीय ताफयामध्ये असणारी पोलीस यंत्रणा, अंगरक्षकामधील पोलीस संख्या कमी  करण्याचा निर्णय घेतला व आपल्या सुरक्षेकरीता तैनात करण्यात आलेली पोलीस यंत्रणा त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी तसेच जमावबंदी मध्ये बंदोबस्ताकरीता जिथे पोलीस विभागाला आवश्यक आहे त्याठिकाणी त्यांनी सोमवारी दि.२३ रोजी सायंकाळीच तैनात करणेकरीता पाठवून दिली आहे.त्यांच्या शासकीय ताफयामध्ये असणाऱ्या चार गाडयांपैकी केवळ एकच गाडीतील पोलीस यंत्रणा ते सध्या शासकीय दौऱ्यामध्ये वापरत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २१ दिवसांचे संपुर्ण देशामध्ये लॉकडाऊन केले असल्याने ना.शंभूराज देसाईंनी शासकीय दौरेही कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याने आपल्या सुरक्षेकरीता एवढया मोठया फौजफाटयाची काही गरज नसून गरज आहे ती कोरोना आजारांला पायबंद करण्याकरीता ठिकठिकाणी देण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची त्यामुळे आपली सुरक्षा कमी करुन जनतेची सुरक्षा करणेकरीता ही यंत्रणा कामी यावी याकरीता त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.