एका अनुमानिताचा रिपोर्ट आला निगेटिव्ह....113 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल
सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथेल दाखल असणाऱ्या एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 71, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 19, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 11, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 6 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 असे एकूण 113 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.