कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 15 तर जिल्हा रुग्णालयात 3 अनुमानीत रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल


कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 15 तर जिल्हा रुग्णालयात 3 अनुमानीत रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल


कराड :   काल दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा सातारा जिल्ह्यातील परदेश प्रवास करुन आलेले 9 नागरिक व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 9 नागरिक अशा एकूण 18 नागरिकांना अनुमानित रुग्ण म्हणून  येथील जिल्हा रुग्णालयात 3 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 15 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल केले असल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.



9 नागरिक हे परदेश प्रवास करुन आलेले असुन त्यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील 5 पुरुष व 4 महिला आहेत. तसेच 7 नागरिक हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले असुन त्यामध्ये 20 ते 84 वयोगटातील 5 पुरुष व 2 महिला असून 1 वर्षाच्या मुलाचा व मुलीचा यात समावेश आहे.  या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे काल रात्री उशिरा पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.