सातारा येथील 6अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह... 19 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल


सातारा येथील 6अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह... 19 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल


कराड -   सातारा येथील शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात 6 पुरुषांना  अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 


सातारा जिल्ह्यातील परदेश प्रवास करुन आलेले 16 नागरिक व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 3 नागरिक असे एकूण 19 नागरिकांना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.


16 नागरिक  हे परदेश प्रवास करुन आलेले असून त्यामध्ये अंदाजे 20 ते 60 वर्ष वयोगटातील 14 पुरुष व 2 महिला आहेत. तसेच बाधित रुग्‍णाच्या संपर्कात आलेले 3 नागरिक अंदाजे 20 ते 60 वर्ष वयोगटातील महिला आहेत. त्यातील एका 40 वर्षीय महिलेस ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने या 19 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.