डांगे साहब है तो सब मुनकीन है.... प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली परवानगी....उद्यापासून कराडकरांना मिळणार घरपोच दूध


डांगे साहब है तो सब मुनकीन है.... प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली परवानगी....उद्यापासून कराडकरांना मिळणार घरपोच दूध


कराड - कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराडसह १३ गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून शंभर टक्के लॉक डाऊन केले आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूही वगळण्यात आल्या होत्या.दरम्यान लहान मुले व वृद्ध लोकांना दुधाचे अत्यंत आवश्यकता असल्यामुळे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे अनेकांनी आग्रह धरला की, कराकरांना दूध पुरवठा व्हावा. दूध पुरवठा करण्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे आता सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 6 ते 8 या दोन्ही वेळेत सर्वांना घरपोच दूध उपलब्ध होणार आहे.


कोयना दूध संघ शहरातील प्रमुख वितरकाकडे दूध पोहच करेल. ते पुढे नागरिकापर्यंत पोहोच करतील. नागरिकांनी गर्दी न करता फोनद्वारे मागणी करावी. म्हणजे प्रत्येक नागरिकांना घरपोच दूध मिळेल. दुध पुरवठा अव्याहतपणे सुरू राहणार आहे. इतर मुख्य वितरक याना घरपोच दूध वितरणासाठी परवानगी दिली आहे.


दूध पुरवठा बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. हे ध्यानात घेऊन कराड शहरात शुक्रवार 24 पासून दूध पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती इन्सिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिघे यांनी केले आहे. दूध वितरणावर प्रशासनाचे लक्ष आहे. नागरिकांनी दुधाच्या नावाखाली गर्दी केल्यास संबंधित दूध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.


गुरुवारी 23 पासून कराड - मलकापूरसह परिसरातल्या तेरा गावात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये होत आहे. यात रुग्णालय वगळता जीवनावश्यक सेवाही बंद होत्या. दूधपुरवठाही होत नसल्याने नागरिकांची विशेषतः लहान मुलांची गैरसोय होत होती. त्यामुळे दूध पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन अखेर घरपोच दूध सेवेला परवानगी देण्यात आली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी दुधाच्या नावाखाली फिरत बसू नये. घरात बसून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image