जिल्ह्यातील विविध प्रश्नावर चर्चा...पालकमंत्री - जिल्हाधिकारी यांची बैठक


जिल्ह्यातील विविध प्रश्नावर चर्चा...पालकमंत्री - जिल्हाधिकारी यांची बैठक


कराड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्याचे प्रशासन हे शासनाने दिलेल्या विविध सूचनांचे तंतोतंत पालन करून नागरिकांना सुविधा पुरवीत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नागरी बँका व पतसंस्था  यांच्या व्यवहाराच्या वेळेत बदल असल्यामुळे इतर आर्थिक व्यवहारात अडचणी निर्माण होत आहेत याबाबत  आणि मेडिकल स्टोअर सुरू ठेवण्याच्या वेळेबाबत येणाऱ्या अडीअडचणीबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेशी चर्चा झाली.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. यापर्शवभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये नागरी बँका व पतसंस्था  यांच्या व्यवहाराच्या वेळेत बदल असल्यामुळे इतर आर्थिक व्यवहारात अडचणी निर्माण होत आहेत याबाबत  तसेच मेडिकल स्टोअर सुरू ठेवण्याच्या वेळेबाबत येणाऱ्या अडीअडचणीबाबत व जिल्ह्यातील सध्याच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या समवेत केली.


याप्रसंगी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या.