आ. पृथ्वीराजबाबांची कराड शहरामध्ये करण्याबाबत जनजागृती 


आ. पृथ्वीराजबाबांची कराड शहरामध्ये करण्याबाबत जनजागृती 


कराड : कोरोना ग्रस्तांची संख्या जगभरात वाढत असली तरी सातारा जिल्ह्यात प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे संक्रमणाचा आकडा थांबलेला दिसतोय तरी सुद्धा संकट टळलेले नाही म्हणून माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरामधील भाजीपाला मार्केट मध्ये जाऊन जनतेशी संवाद साधत जनजागृती केली.


काही दिवसांपूर्वी आ चव्हाण यांनी ग्रामीण भागाचा दौरा करीत ग्रामस्थांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला होता तर आज कराड शहरामधील भाजीपाला मार्केट, मंडई तसेच कार्वेनाका येथील मंडई मध्ये जाऊन जनतेशी संवाद साधत कोरोनाबद्दल जनजागृती केली. यावेळी आ चव्हाण यांच्यासोबत कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, प्रदीप जाधव, आर.जी. लुन‍िया, युवा नेते इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते. 


याबद्दल आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कोरोनाला हरवायचे आहे हे आम्ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ठामपणे ठरविले आहे. यासाठी शक्य तितके प्रयत्न आम्ही करत आहोत. या प्रयत्नांना जनता सुद्धा साथ देत आहे, पण तरी सुद्धा गरजेच्या वस्तूंसाठी लोक घरातून बाहेर पडतच आहेत. अश्या लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती व्हावी यासाठीच मी आज कराड शहरातील भाजी मंडई मध्ये जनतेशी संवाद साधला. या संवादातून मी जनतेला हेच सांगत आहे कि, कोरोनाचे संकट फार गंभीर आहे म्हणून तुम्ही सर्वांनी सुद्धा हे संकट गांभीर्याने घ्या, अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि बाहेर पडताना तोंडाला मास्क बांधा, ठराविक अंतर ठेवा, हात वारंवार साबणाने धूत जा अश्या काही सूचना एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या मतदारसंघातील जनतेला देत आहे. 


कोरोनाला हरविण्यासाठी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणेच सर्वच लोकप्रतिनिधी व प्रशासन, डॉक्टर्स, हॉस्पिटल कर्मचारी,पोलिस यंत्रणा, अंगणवाडी सेविका, आदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यांना साथ देणे हि आपली जबाबदारी आहे यासाठीच सर्वांनी सुरक्षिततेसाठी घरीच राहा.