नागठाणे येथील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली प्रशासनाकडून माहिती


नागठाणे येथील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली प्रशासनाकडून माहिती


कराड - नागठाणे (ता.सातारा) येथे महाराष्ट्र राजयचे  सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. 


तसेच येथील स्वस्त धान्य दुकासन अचानक भेट दिली. तेथे रेशन वितरणाचे काम सुरू होते. दुकानाचे मालक यांच्याशी  चर्चा केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांशीही चर्चा केली. दुकानासमोर उभ्या असणाऱ्या लोकांना उन्हात न थांबता सोशल डिस्टन्स ठेवून सावलीत बसण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दुकानासमोर गर्दी होऊ नये यासाठी दुकानातील वजन काटे वाढवून तातडीने रेशन देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.  


त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत होम टू होम सर्व्हे करून परागावातून, परजिल्ह्यातून कोण आले आहे का याची माहिती घ्यावी,   याबाबत सविस्तर चर्चा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सरपंच विष्णू साळुंखे व ए.पी.आय. चंद्रकांत माळी यांच्यासोबत केली.


तसेच कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळवे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.


याप्रसंगी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत हरी साळुंखे(नाना), सरपंच विष्णू महादेव साळुंखे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय शिवाजी साळुंखे, ए. पी.आय. चंद्रकांत माळी साहेब आदी.उपस्थित होते.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image