२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने....सामान्य माणसांचा आवाज


२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने....सामान्य माणसांचा आवाज


कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर यांना आजपर्यंत अनेक संस्थांनी सर्वोत्कृष्ट प्रकाशक / प्रकाशन संस्था म्हणून सन्मानित केलेले आहे. एका छोट्याशा गावातल्या अर्थात ग्रामीण भागातल्या या प्रकाशनानं जगाच्या साहित्य साहित्य क्षेत्राच्या नकाशावर स्थान पटकावलं आहे. आम्ही फक्त पुस्तकेच बनवत नाही तर जागतिक पातळीवर आम्ही मोठी झेप घेतली आहे आणि ही आमच्यासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. सामान्य माणसांचा आवाज, त्यांचे विचार विशेष लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम कवितासागरच्या माध्यमातून करत आहोत.


आम्ही बनवलेली सर्व पुस्तके अत्यंत उच्च दर्जाची आहेत आणि आजपर्यंत आमचं एकही पुस्तक अयशस्वी ठरलेलं नाही. याचं कारण आमच्या प्रकाशनात अनेक कुशल व अनुभवी लोक काम करत आहेत आणि ते आपले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवत आहेत. यातून गुणवत्ता राखली जात आहे. आमच्या प्रकाशनानं कायमच देशाला सध्याच्या परिस्थितीत काय गरज आहे, याचा विचार करून अत्यंत उपयुक्त पुस्तके विकसित केली. मुद्रण-प्रकाशन-वितरण या क्षेत्रात प्रकाशनाला मिळणार्‍या फायद्याचं प्रमाण खूपच कमी आहे, मात्र या कामाच्या यशातून आम्हा सर्वांना ‘किक’ मिळते व म्हणून आम्ही हे काम अत्यंत झपाटून करतो. आम्ही अत्यंत शांतपणे व संयमाने काम करणारी प्रकाशन संस्था आहोत. आम्ही आमच्या कामाचा कुठंही गवगवा करीत नाही किंवा बडेजाव करत नाही. आमच्या प्रकाशन संस्थेकडे सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळ आणि तंत्रकुशलतेचा उपयोग करून आम्ही इतरही काही क्षेत्रांत प्रवेश करणार आहोत. देशाच्या प्रगतीमध्ये आम्ही हातभार लावू शकतो, माहिती व मनोरंजनाबरोबरच ज्ञानाच्या कक्षा रुंदावू शकतो याचा आमची कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर आणि कर्मचार्‍यांना सार्थ अभिमान आहे.


यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी अथक मेहनत, प्रयत्न आणि कष्ट यासह अन्य कलागुणांच्या शिडीचाही वापर करावा लागतोच. मुद्रण आणि प्रकाशनाच्या क्षेत्राकडे मी व्यवसाय म्हणून न पाहता आवडीचे काम म्हणून पाहत असल्याने मला काम करताना कंटाळा न येता प्रत्येक गोष्ट मी अत्यानंदाने, उत्साहाने आणि अत्यंत सकारात्मकतेने करत असल्याने आणि परंपरागत प्रकाशन व्यवसायाला मी आधुनिक टच दिल्यामुळेच मला कमी कालावधीत जास्त यश मिळाले.


वाचकांना सखोल माहितीचा आधार असणारा सकस सहज सोप्या शैलीतील मजकूर पुस्तक अथवा ग्रंथरूपात वाचायला मिळावा, वाचकांना लेखकांना वाचनानंद मिळावा.


कवितासागर पब्लिशिंग हाऊसची स्थापना प्रकाशन गृह म्हणून झाली आहे. सामाजिक / आशय विषयांवरीलप्रश्नांसंबंधीकलाविज्ञान-तंत्रज्ञानसंत साहित्य तसेच मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी दर्जेदार पुस्तकांची / ग्रंथांची निर्मिती करणे. प्रकाशन कार्यक्रम आयोजित करणे. कवितासागर हे वार्षिक प्रसिद्ध करणे. वेगवेगळी पुस्तके अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगभरातील वाचकांच्या पर्यंत पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे.


वयाच्या दहाव्या वर्षी माझा निबंध महाराष्ट्रातील नामांकित दिवाळी अंक ‘प्रसाद’ मध्ये प्रसिद्ध झाला आणि मला माझ्या पहिल्याच लेखाला मानधनसुद्धा मिळाले; त्यातूनच माझे साहित्य क्षेत्रात चांगले पदार्पण झाले, माझा लेख महाराष्ट्रभर पोहचला, तो काळ खूप वेगळा होता. लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याची मला खूप आवड होती. कमी वयात विविध प्रकारची संधी मला मिळत गेली मीसुद्धा प्रत्येक संधीचे सोने केले. माझ्या वाचनाच्या आवडीचे पुढे आंतरराष्ट्रीय प्रकाशन व्यवसायात रुपांतर झाले. मात्र हे सर्व काही माझ्यासाठी सोपे नव्हते.


बुलढाणा जिल्ह्यातील जामगाव (मेहेकर) येथे १ मे १९९० रोजी ‘काव्यबहार’ नावाचे काव्यविषयक अनियतकालिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मोठ्या धाडसाने आणि अनेक अडचणींचा धैर्याने सामना करून सुरु केले. त्यानंतर दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. नोकरीत मन रमेना म्हणून ‘प्राचार्य’ पदाची नोकरी सोडून पूर्णवेळ मुद्रण-प्रकाशन-वितरण व्यवसायाला सुरुवात केली.


मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात प्रिंट मीडियाचे महत्त्व कमी होत चालल्याची चर्चा आहे; पण सवडीने एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी प्रिंट मीडियाचा महत्त्वाचा आधार आहे. छापील पुस्तक हातात घेऊन वाचणे हा वेगळाच आनंद आहे. वाचन कमी होत आहे असे मला वाटत नाही. गावोगावी गंभीर लेखन वाचणारे तरुण आहेत. मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची नितांत गरज आहे. प्रकाशकांनी गावोगावी जाऊन वाचकांच्यापर्यंत विविध मार्गांनी पोहोचले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.  


कोणत्याही भाषेतील साहित्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य पुस्तके करतात. पुस्तके माणसाला जगण्याची प्रेरणा देतात. माणसांचं जगणं पुस्तकांमध्ये असतं. लोकांना जागरूक, कृतिशील करण्याचे व दिशा देण्याचे काम साहित्यिक, लेखक, कवी व पुस्तके करत असतात.


आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेकांच्या मार्गदर्शन, मदतीने आपण घडत असतो. त्यामुळे आपण कोण आहोत, यापेक्षा आपण कोणामुळे आहोत हे ओळखून ज्यांनी आपल्याला घडविले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवली पाहिजे.


 


- डॉ. सुनील दादा पाटील


कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर 


Popular posts
कोरोनाला प्रतिबंध करायचे, मृत्यूला परत पाठवायचे तर एकांतवासात राहायचे
Image
श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचेकडून १६ हजार ५०० वह्यांचे वाटप......शाळा नंबर ३ चा कायापालट होणार : राजेंद्रसिंह यादव
Image
पुणे कारागृहातुन आलेले 2 जणांसह 5 बाधित..आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्णांची संख्या
श्री गजानन सेवा ट्रस्ट यांचेकडून मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश
Image
अन्यथा महामार्गाचे काम बंद पाडणार....मलकापूर हद्दीतून येणारे पावसाचे पाणी कोयना नदीत सोडावेरा.....जेंद्रसिंह यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Image