सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113

 


सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113


कराड : गुरुवार हा सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने घातक वार ठरतो आहे. कारण आज सकाळी 3 कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट आल्यानंतर अजून 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त असून सातारा जिल्ह्यात 113 रुग्णांची संख्या झाली आहे. दरम्यान प्राप्त रिपोर्ट मधील 18 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.


सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यामुळे नागरिकांच्यांतून अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. विशेषता कराड तालुक्यात रुग्णांची संख्या का वाढते ? या प्रश्नांचे उत्तर मात्र अद्याप प्रशासन समाधानकारक दिलेले नाही. दरम्यान कराड तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात असणारे अनुमानित व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याने येत आहेत.