पिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत


पिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत


कराड -सगळ जग  कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करित आहे ... मात्र  सातारा जिल्ह्यातील पिंपरी येथील तरुण ऋषिकेश तुपे शेतक-यांने कोणताही डामडॊल न करता अत्यंत साध्या घरगुती पध्दतीने लग्न करुन ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले.यावेळी ऋषीकेश तुपे, सॊ.सायली तुपे,राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने हे उपस्थित होते.


कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत सर्व जगभरात सर्वांना मोठा फटका बसला आहे. सातारा जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने १०० टक्के संचार बंदी आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील पिंपरी येथील ऋषिकेश तुपे यांचा विवाह जिहे येथील विठ्ठल फडतरे यांच्या कन्या सायली हिच्याशी दोन महिन्यापूर्वी निश्चित झाला होता. मात्र हा विवाह मोठा शाही पध्दतीने होणार होता मात्र २१ मार्च पासुन कोरोना विषाणू परिस्थितीमुळे अडचण निर्माण झाली मात्र हा विवाह घरगुती पध्दती‌ने करुन विवाहात होणा-या खर्चातील रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याबाबत एकमत झाले.


५ मे रोजी ठरलेल्या तारखेला दुपारी २ वाजता घरातील ८ जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लग्नानंतर तुपे कुटुंबाच्या वतीने ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वर्ग करण्यात आला.
 सातारा जिल्ह्यातील पिंपरी येथील तरुण शेतक-याने साध्या पध्दतीने‌ लग्न करुन शासनाला केलेली मदत हि समाजापुढे नवीन आदर्श निर्माण करुन दिला आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image