आदरणीय पी.डी.पाटीलसाहेबांच्या विचारधारेवर कार्य करावे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ....... आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांना आदरांजली


आदरणीय पी.डी.पाटीलसाहेबांच्या विचारधारेवर कार्य करावे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील


आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांना आदरांजली


कराड : कराड भाग्यविधाते, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त, सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.शेखर सिंह, सातारचे उपवनसंरक्षक मा.डॉ.भारतसिंह हाडा यांनी कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या फोटो प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.


याप्रसंगी कार्यकारी सचांलक आबासाहेब पाटील यांनी आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देताना सांगितले की, देशाचे नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या प्रेरणेने आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी कारखान्याची निर्मिती केली असून कार्यक्षेत्रातील सर्व जमीन बागायत होण्यासाठी कारखाना पुरस्कृत पाणी पुरवठा संस्थांची स्थापना केली. आजमितीस या सर्व योजना उत्तम प्रकारे सुरू आहेत. कारखान्यासह इतर संस्थांच्या माध्यमातून सभासद कर्मचार्‍यांची सामाजिक व आर्थिक प्रगती झाली आहे असे सांगून आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या विचारधारेवर आपण सर्वांनी कार्य करावे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.लक्ष्मीताई गायकवाड, कारखान्याचे संचालक व कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील(बाबा), सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, धामणेरचे आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी- माजी सदस्य, व सर्व संचालक, कार्ङ्मकारी संचालक आबासाहेब पाटील, सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image
अन्यथा महामार्गाचे काम बंद पाडणार....मलकापूर हद्दीतून येणारे पावसाचे पाणी कोयना नदीत सोडावेरा.....जेंद्रसिंह यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Image
बाहेरगावाहून आलेल्या सर्वांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करावी : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई
Image
कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविणाऱ्यांनामहा महाराष्ट्र सायबरतर्फे कारवाईचा इशारा
Image
डांगे साहब है तो सब मुनकीन है.... प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली परवानगी....उद्यापासून कराडकरांना मिळणार घरपोच दूध
Image