"लिबर्टी"च्या खेळाडूंना आता मॅटवरील कबड्डीचे प्रशिक्षण देणार - सुभाषकाका पाटील......लिबर्टी मजदूर मंडळाची ६५ वी सर्वसाधारण सभा संपन्न


कराड (राजसत्य) - कबड्डी खेळाचे तंत्रज्ञान बदलले असून कबड्डी खेळासाठी लिबर्टी मजदूर मंडळाच्या खेळाडूंसाठी मॅटवरील प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंची सर्व काळजी लिबर्टी मजदूर मंडळ घेणार असून खेळाडूंचा विमा पॉलिसी उतरला जाणार असल्याची माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांनी दिली.


लिबर्टी मजदूर मंडळाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केली होती. यावेळी उपाध्यक्ष अरुण जाधव, सचिव रमेश जाधव, ज्येष्ठ संचालक मानसिंगराव पाटील, सुभाष डोळ, मुनीर मोमीन, काशीनाथ चौगुले, मुनीर बागवान, विजय गरुड, सचिन पाटील, दादासाहेब पाटील, भास्कर पाटील, राजेंद्र जाधव, पी. एल. कुलकर्णी, नगरसेवक हणमंतराव पवार, रामभाऊ रैनाक, संभाजी सुर्वे, अमृत देशपांडे, प्रकाशबापू पाटील, शशिकांत पोळ, नंदकुमार बटाणे, विनायक पवार, अशोकराव शिंदे, चंद्रकांत जाधव, डॉ. अरुण पावसकर, विठ्ठल पाटील, अहमद पठाण, लक्ष्मण पाटील, विलास कराळे यावेळी उपस्थित होते.


लिबर्टी मजदूर मंडळामध्ये यापूर्वी व सध्या खेळत असणारे एक-दोन वर्षे खेळलेल्या खेळाडूना सभासद करून घेणार आणि मंडळाचे हितचिंतक, वर्गणीदार यांना आजीव सभासद करणार आहोत. लिबर्टी मजदूर मंडळाची व्यायामशाळा अद्ययावत आहे. व्यायाम शाळेमध्ये लिबर्टीच्या खेळाडूंना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगून अध्यक्ष सुभाषकाका पाटील म्हणाले, जानेवारी महिन्याच्या अखेरीस "खेळीया" या पुस्तकाचे प्रकाशन, कबड्डी खेळासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कबड्डी खेळाडूंचा सत्कार आणि वजनी गटातील कबड्डी स्पर्धांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सुभाषकाका पाटील यांनी सांगितले.


लिबर्टी मजदूर मंडळाच्या घटनेत बदल सुचवला आहे या संबंधाने मानसिंगराव पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती उपस्थित सभासदांना दिली. युवकांनी मैदानी खेळासाठी आपले योगदान द्यावे. यासाठी लिबर्टी मजदूर मंडळाने खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याचे मंडळाचे सचिव रमेश जाधव यांनी सांगितले. अरुण जाधव, सुभाष डोळ, विजय गरुड, मुनीर बागवान, यांनी सूचना वाचून अनुमोदन दिले. दरम्यान नगरसेवक हणमंतराव पवार, इंद्रजीत पाटील, जितेंद्र जाधव, रामचंद्र चौगुले, विनायक पवार यांनी विषय पत्रिकेतील सूचनेवर काही दुरुस्त्या सुचविल्या याची नोंद घेण्याची संचालक मंडळाला विनंती केली.


विषयपत्रिकेवरील पाच विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय पत्रिकेचे वाचन सचिव रमेश जाधव यांनी केले तर मानसिंगराव पाटील यांनी आभार मानले. लिबर्टी मजदूर मंडळाच्या सर्व साधारण वार्षिक सभेला बहुसंख्य खेळाडू उपस्थित होते.