रौप्यमहोत्सवी आमदार बाळासाहेब पाटील आता नामदार होणार


                               (गोरख तावरे)
रौप्यमहोत्सवी आमदार साजरा करणारे बाळासाहेब पाटील आता नामदार होणार आता हे स्पष्ट झाले आहे. स्वच्छ,पारदर्शक, शांत,संयमी, निष्ठावंत, एकनिष्ठता आमदार बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मंत्रिपदाची संधी देऊन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेला न्याय दिला आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे यशवंत विचाराला न्याय मिळाला, अशी लोकभावना कराड उत्तर मतदारसंघांमध्ये निर्माण झाली आहे. सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून१५ मिटानी आमदार बाळसाहेब पाटील यांचा मुंबई विधानभवनांमध्ये शपथविधी होणार आहे.


सलग पंचवीस वर्षे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीनुसार निवडून येत आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनता नेहमीच आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर, निष्ठापूर्वक विश्वास ठेवत व आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या वैचारिक पायवाटेने वाटचाल करणारे आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यामुळे उत्तर मतदारसंघांतील जनतेमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार बाळासाहेब पाटील हे सोमवारी 30 डिसेंबर रोजी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत."आपणाला मंत्रिपद मिळावे" यासाठी कधीही आमदार बाळासाहेब पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला नाही. किंवा वातावरण निर्मिती करून कधी संधीची प्रतीक्षा केली नाही. बाळासाहेब पाटील यांना कराड उत्तर विधानसभा मतदार संघ व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी सातत्याने ऊस उत्पादक शेतकरी व मतदारसंघातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत.


आमदार बाळासाहेब पाटील यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वावरणे हे प्रामाणिक, सकारात्मक वैचारिक बैठक असल्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांना कराडकर जनतेसह जिल्ह्यातील जनतेचा सकारात्मक लोकप्रतिनिधी म्हणून जनमान्यता मिळाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचारांवर व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब यांनी उत्तर मतदारसंघांमध्ये घालून दिलेल्या पायवाटेने वाटचाल करणारे आमदार बाळासाहेब पाटील आज मंत्रीपदाची शपथ घेत आहेत.३० डिसेंबर हा कराड उत्तर मतदार संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व आनंदाचा दिवस आहे. कारण 29 वर्षानंतर उत्तर मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.