कोल्हापूरचे अमित बोरकर......उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश

 


 



 


कोल्हापूर - येथील अॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधी सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे.


आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयात श्री. बोरकर यांनी अतिरिक्त न्यायाधीश पदाची शपथ ग्रहण केली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी त्यांना शपथ दिली. मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या बोरकर यांनी जुलै १९९४ ते मे १९९७ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा, दिवाणी न्यायालयांसह अन्य प्राधिकरणांवर काम केले आहे. त्यांनी दिवाणी, घटनात्मक, सहकार, शिक्षण, व्यापार कायदे, शैक्षणिक, सेवा आदी विषयांतील खटल्याचे कामकाज पाहिले आहे. जून १९९७ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान पीठासमोर ते काम करीत आहेत. सन २००९ पासून त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधी सल्लागार म्हणून काम पाहिले. याखेरीज महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचेही विधी सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.


न्या. बोरकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शनिवार ब्रँच शाळा, न्यू हायस्कूल येथे झाले. विवेकानंद महाविद्यालय व शहाजी विधी महाविद्यालय येथे उच्चशिक्षण झाले आहे.


Popular posts
कोरोनाला प्रतिबंध करायचे, मृत्यूला परत पाठवायचे तर एकांतवासात राहायचे
Image
श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचेकडून १६ हजार ५०० वह्यांचे वाटप......शाळा नंबर ३ चा कायापालट होणार : राजेंद्रसिंह यादव
Image
पुणे कारागृहातुन आलेले 2 जणांसह 5 बाधित..आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्णांची संख्या
श्री गजानन सेवा ट्रस्ट यांचेकडून मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश
Image
अन्यथा महामार्गाचे काम बंद पाडणार....मलकापूर हद्दीतून येणारे पावसाचे पाणी कोयना नदीत सोडावेरा.....जेंद्रसिंह यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Image