नवरदेवाने सत्यशोधक पद्धतीने बांधली लग्नगाठ..... खासदार श्रीनिवास पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या नवदाम्पत्याला आशीर्वाद


नवरदेवाने सत्यशोधक पद्धतीने बांधली लग्नगाठ....खासदार श्रीनिवास पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या नवदाम्पत्याला आशीर्वाद


पुणे - विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साथीदार कोण असणार याची पूर्वगाठ बांधली गेलेले आहे. त्याच पद्धतीने विवाहबंधनात दोन जीव अडकतात. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. सर्व धर्मामध्ये लग्न म्हणजे संस्कार म्हणून पहिले जाते. हिंदू धर्मीयांमध्ये विवाह हा संस्कार आहे. तर अन्य धर्मीयांमध्ये हा करार आहे. प्राचीन काळापासून विवाह म्हणजे एक धार्मिक बंधन समजले जाते. विवाह म्हंटले की वाजंत्री, पुरोहित, नातेवाईक, मंत्र अक्षता याचा एकत्रित शुभ समारंभ असतो त्यावर मोठा खर्च होतो. अन शुभमंगल सावधान म्हणून मंगलाष्टका म्हटल्या जातात.


महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि आपले विचार मांडले. सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी व त्यानी पुरोहिताशिवाय लग्न लावण्यास सुरुवात केली. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजमनात दृढ व्हावेत. यासाठी फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल फाउंडेशनच्यावतीने श्री रघुनाथ ढोक यांचे पुढाकाराने पुणे येथे सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला. महात्मा फुले हे सत्यशोधक चळवळीचे प्रणेते आहेत. लग्नसमारंभातील सर्व विधी नाकारून दाम डॉल बाजूला ठेवून


श्रीमती पौर्णिमा विठ्ठल लिखिते यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांनी श्री हरभजन सिंग यांची कन्या कंवर प्रित कौर यांचा विवाह मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत खासदार श्रीनिवास पाटील व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साक्षीने संपन्न झाला. साक्षीदार म्हणून या दोन्ही मान्यवरांनी सह्या केल्या. शुभ सोहळ्यास श्री देवी सिंह शेखावत पुणे विद्यार्थी गृह संचालक मंडळाचे सर्व संचालक मुलामुलींचे नातेवाईक उपस्थित होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नवदांपत्यास महात्मा फुले, यांची प्रतिमा आणि भारतीय राज्यघटना देऊन त्यांना आशीर्वाद दिले


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image