कराड शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी........डॉ. राजेंद्र कंटक यांचे शिवसेनाप्रमुखांच्या भावमुद्रांचे चित्र प्रदर्शन
कराड - कराड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती कराड शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने साजरी करण्यात आली. दत्त चौक येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. राजेंद्र कंटक यांनी यशवंतराव चव्हाण कला दालनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रांचे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. या चित्रप्रदर्शनातचे उद्घाटन श्रीमती अंजली कंटक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी जितेंद्र कंटक, प्राजक्ता कंटक, नम्रता कंटक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रा पाहून रसिक भारावून गेले. शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे अद्भुत प्रदर्शन असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कराड एसटी स्टँड समोर चष्मा शिबिर आयोजित केले होते. याचे उद्घाटन सलीम मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. मोफत डोळे तपासणी व अल्पदरात त्याच ठिकाणी चष्मा देण्यात आला. नाममात्र दरात उच्च प्रतिचा चष्मा वाटप करण्यात आल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंब व्यक्तिमत्वाला साजेल असा मोठा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच दत्त चौकात मोठा मंडप घालून त्यामध्ये शिवसेनाप्रमुखांना शिवसैनिकांनी अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख नितीन काशीद, कराड शहरप्रमुख शशिराज करपे, उपतालुकाप्रमुख दिलीप यादव, संजय चव्हाण, काकासाहेब जाधव, प्रमोद वेर्णेकर, माजी तालुकाप्रमुख विनायक भोसले, अण्णा रेंदाळकर, प्रसिद्धीप्रमुख अजित पुरोहित, कराड शहर उपशहरप्रमुख साजिद मुजावर, कुलदीप जाधव, शेखर बर्गे, अक्षय गवळी, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम साळी, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, मलकापूर उपशहर प्रमुख सूर्यकांत मानकर, प्रमोद तोडकर, ग्राहक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र माने, ग्राहक कक्षाचे तालुका संघटक बापुसो भिसे, वाहतूक जिल्हा संघटक ज्ञानदेव भोसले, वाहतूक सेना उपजिल्हा संघटक पोपट, कांबळे दशरथ धोत्रे, कांबळे कोडोली विभागप्रमुख महेश कोळी, प्रवीण लोहार, महेश पवार, अशोक पवार, निलेश पारखे, यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.