पत्रकारांच्यावर खरे - खोटे दोन प्रकारचे हल्ले - खा. श्रीनिवास पाटील......नवरत्न दर्पण पुरस्काराने गोरख तावरे यांचा गौरव

कराड - दर्पण म्हणजे समाजाचा आरसा हा आरसा स्वच्छ असला पाहिजे, पत्रकार आरशाची भूमिका करत असताना पत्रकारांनी आरश्यावर धूळ बसू दिले नाही पाहिजे, समाजाचे चित्र दाखवताना आरसा स्वच्छ असला पाहिजे, समाजाच्या चेहऱ्यावरील धूळ साफ करताना आरश्यावर धूळ निर्माण झाली नाही पाहिजे, याची दक्षता पत्रकारांनी घ्यावी असे आवाहन करून खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांच्यावरील वाढते हल्ले पाहता सरकारने दखल घेऊन याबाबत कायदा केला आहे. पत्रकारांच्यावर होणारे हल्ले दोन प्रकारचे असतात, काही हल्ले खरे, तर काही हल्ले खोटे असतात.


महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्यावतीने पत्रकार दिन व नवरत्न दर्पण पुरस्कार समारंभ सातारा येथील शाहू कला मंदिरामध्ये संपन्न झाला. यावेळी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, मनीषा लोहार उपस्थित होते.


गेल्या तीस वर्षापासून गोरख तावरे पत्रकारितेत सक्रिय कार्य करीत आहेत. दैनिक "सामना"चे प्रारंभापासून कराड प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष असून कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत. शासनाने पत्रकार कल्याण निधीची स्थापना करावी यासाठी आग्रही भूमिका मांडली. यामुळे शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वृत्तपत्र व पत्रकारांच्या प्रश्नांच्या बैठकीत चर्चेत उपस्थिती लावून वृत्तपत्र व पत्रकारांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केला आहे.


Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image