सह्याद्री" ने ऊसाला रास्त भाव दिल्याने राज्यात आदर्श निर्माण झाला - जशराज पाटील......संचालकपदी निवड झाल्याबद्दल जशराज पाटील यांचा सत्कार........निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल मानले सभासदांचे आभार


"सह्याद्री" ने ऊसाला रास्त भाव दिल्याने राज्यात आदर्श निर्माण झाला - जशराज पाटील...........निवड झाल्याबद्दल जशराज पाटील यांचा सत्कार......... निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल मानले सभासदांचे आभार


कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारखान्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील (बाबा) यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे सर्व खातेप्रमुख व विभाग प्रमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


यावेळी सत्काराला उत्तर देताना जशराज पाटील (बाबा) म्हणाले की, नवं महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेने व आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या दुरदृष्टीतून स्थापन झालेल्या तसेच राज्याचे सहकारी व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक- सभासदांच्या ऊसाला रास्त भाव देवून राज्यात आदर्श निर्माण केलेला आहे. कारखान्याच्या माध्यमातून जिरायत जमीन बागायत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कारखान्याचे विद्यमान चेअरमन नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर कारखान्याच्या सन्माननीय सभासदांनी विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे आभार मानले.


यावेळी प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. आभार ऊस विकास अधिकारी वसंतराव चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी.आर.यादव, फायनान्सीयल ॲडवायझर एच.टी.देसाई, चीफ अकौंटंट जी.व्ही.पिसाळ, कामगार कल्याण अधिकारी एन.आर.जाधव, सिव्हिल इंजिनीअर उदय पाटील, जनसंपर्क अधिकारी व्ही.जे.शेलार, शेती अधिकारी मोहनराव पाटील, इ. डी.पी.मॅनेजर पी.एस.सोनवणे, डिस्टलरी इंचार्ज डी.जे.जाधव, परचेस अधिकारी जे.डी.घार्गे, इरिगेशन इंजनिअर डब्लू.एल.साळुखे, पर्यावरण इंगनिअर एच.जे.माने, चीफ केमिस्ट जी.पी.करांडे, गोडाऊन किपर एस.बी.साळुखे, स्टोअर विभाग प्रमुख डी.एन.पिसाळ, उप ऊस विकास अधिकारी एस.जी.चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी एन.एस. साळुखे, वाहन विभाग प्रमुख मोहनराव पिसाळ, सुरक्षा विभाग प्रमुख एस.बी.नाईगडे यांचेसह विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.