"शिकारा" चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घालावी हिंदु जनजागृती समितीची निवेदनाव्दारे शासनाकडे मागणी


"शिकारा" चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घालावी
हिंदु जनजागृती समितीची निवेदनाव्दारे शासनाकडे मागणी


कराड, - 'विनोद चोप्रा फिल्म' निर्मित प्रदर्शित झालेला 'शिकारा' हा हिंदी चित्रपट काश्मिरी हिंदूंच्या जीवनावर आधारित असल्याने चित्रपटाच्या 'ट्रेलर'च्या माध्यमातून सांगितले गेले होते. गेली ३० वर्षे अत्याचार पीडीत काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात सरकार, बुद्धिवादी, तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आदी कोणीच आजवर बोलले नाही. पण या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच कोणीतरी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराची दखल घेतली असे प्रथमदर्शनी वाटले होते. प्रत्यक्षात मात्र शिकारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याचा ऐवजी त्यांच्या ३० वर्षांपूर्वीच्या जखमा खोदून पुन्हा एकदा त्यावर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याची भावना काश्मिरी हिंदूंच्या मनात निर्माण जाते आहे. काश्मिरी हिंदूंवर झालेला भयंकर अन्याय हा 'झालाच नाही' अशा प्रकारे चित्रपटातून दाखवणे म्हणजे काश्मिरी हिंदूंवर मानसिक अत्याचार केल्यासारखे आहे. 


सेन्सर बोर्डाने त्वरित चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे आणि या चित्रपटावर बंदी घालावी. तसेच केंद्र सरकारनेही या चित्रपटात दाखवलेल्या अयोग्य चित्रणाबद्दल निर्मात्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांच्या नावे कराडचे निवासी नायब तहसीलदार आनंद देवकर यांना देण्यात आली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे सागर आमले, अनिल सागावकर, विजय चव्हाण, विनोद देवकर, गोरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष सुनील पावसकर, रणरागिणी शाखेच्या कांतावती देशमुख, छाया जमाले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मदन सावंत, मनोहर जाधव, अनिल कडणे, सनातन संस्थेचे सर्वश्री लक्ष्मण पवार, चिंतामणी पारखे, अरुण जाधव आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.