महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा 15 हजार शेतकऱ्यांना लाभ - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा 15 हजार शेतकऱ्यांना लाभ - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील


कराड -  महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील 31 लाख शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 15 हजार 328 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून 97 कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे, अशी माहिती  सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.


प्रायोगिक तत्वावर काही जिल्ह्यातील 2 गावांची निवड करुन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आत्तापर्यंत राज्यातील 15 जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. ज्या ग्रामपंयायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे अशा ग्रामपंचायतींच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. टप्याटप्याने संपूर्ण राज्यातील याद्या प्रसिद्ध करणार असून ही योजना अत्यंत सुटसुटीत असून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचे असल्यामुळे शेतकरीही समाधान व्यक्त करत आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.