काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करावी - पृथ्वीराज चव्हाण


काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करावी - पृथ्वीराज चव्हाण


कराड - काँग्रेसचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जावा, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले असतानाच, 'काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करून, निवडणुकांच्या माध्यमाने कार्यकारिणी निवडावी, तरच चांगले नेते पुढे येतील', अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.


एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या चव्हाण यांनी माहिती दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'काँग्रेस कार्यकारिणीसाठी आधी निवडणूक होत होती. तेव्हा काही निवडून येत, काही अध्यक्ष नियुक्त करीत आणि जुन्या-नव्याचा संगम साधला जाई. आता फक्त नियुक्ती होते. त्यामुळे युवक काँग्रेसचे नेते आणि गुलामनबींसारखे ज्येष्ठ नेते सारखेच झाले. निवड थांबल्याने नेतृत्व विकास थांबला. निवड आणि नियुक्ती पद्धतीने तरुण आणि ज्येष्ठांचा समन्वय साधला जावा.'


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image