भगव्याची आणि छत्रपतींच्या कार्याला साजेशी तरुण पिढी तयार व्हावी ही इच्छा...!


भगव्याची आणि छत्रपतींच्या कार्याला साजेशी तरुण पिढी तयार व्हावी ही इच्छा...!


गेल्या 7-8 वर्षांपासून हिंदुत्ववादी नेते‌ विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू एकता संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय, सुरुवातीच्या काळात विक्रमबाबांनी दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न केला. हिंदुत्वाबद्दलची तळमळ बघून मला विभागप्रमुख या पदावर काम करायची संधी मिळाली,या काळात हिंदुत्ववादी विचारांच्या तरुणांना संघटनेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आणि संघटनेचा पाया तांबवे विभागात मजबूत करायच्या दिशेने प्रयत्न चालू केले. भागातील तरुणांची साथ यावेळी मिळाली.


चार वर्षांपूर्वी म्हणजे 23 फेब्रुवारी 2016 रोजी मार्गदर्शक जेष्ठनेते विनायकराव पावसकर (अण्णा), जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (बाबा) यांनी मला हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या पाटण तालुकाध्यक्षपदी नियुक्त केले. माझ्या वयाच्या 25 व्या वर्षी फार मोठा विश्वास माझ्यावर विक्रमबाबांनी दाखवला. विक्रमबाबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा हे धोरण मनाशी बाळगून परत नव्या दमाने संघटनेच्या कामाला लागलो.जुन्या नव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तालुक्यात हिंदुत्वाचे भगवे वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अनेक अडचणी आल्या परंतु विक्रमदादांची खंबीर साथ असल्याने त्याचा काहीही परिणाम माझ्या हिंदुत्त्वाच्या कार्यावर झाला नाही.


हिंदू एकता आयोजित हिंदू युवा मेळावे,शिवजयंती उत्सव,two wheeler रॅली,हिंदुत्ववादी आंदोलन,राम मंदिर संकल्प रॅली इ अशा अनेक कार्यक्रमांना पाटण तालुक्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची ताकद विक्रमबाबांच्या पाठीशी उभी केली. कार्यकर्त्यांचा संपर्कात राहणे,कार्यकर्त्यांच्या अडचणी दूर करणे,त्यांच्या सुख दुःखाच्या प्रसंगात उभे राहणे, त्याला संघटनेच्या कार्यात मदत करत असताना त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचबरोबर भागातील विविध प्रश्नांचा आवाज, शेतकऱ्यांच्या प्रश्नसांबांधी आंदोलने, हिंदूंचे धार्मिक सण याबाबत जागृती, विध्यार्थ्यांच्या संबंधित आंदोलने, गोमातेला कत्तल खाण्यात नेण्यापासून वाचवणे, आपल्या धर्माचा अभिमान जागृत करणे, पूरग्रस्तांना मदत, दुष्काळ ग्रस्तांना मदत,गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, शालोपयोगी साहित्याचे वाटप करणे, विक्रमबाबांच्या माध्यमातून गावात विकासकामे आणणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशी एक ना अनेक सामाजिक कार्ये संघटनेच्या माध्यमातून केली.


पदाचा वापर फक्त letter pad पुरता न ठेवता सर्व सामान्यांच्या मदतीसाठी केला, संघटनेवर निष्ठा कायम ठेवली, यावेळी मला सुपने गावातील अजिंक्य ग्रुप,केदारनाथ ग्रुप, राजवीर ग्रुप, शिवमुद्रा ग्रुप, नवबौद्ध ग्रुप,ज्ञशिवतेज ग्रुप,हआदर्श ग्रुप, श्री गणेश मंदिर कमिटी, भाग्योदय मंडळ,जय भवानी मंडळ, छावा ग्रुप, जय माता दि मंडळ या मंडळातील कार्यकर्त्यांचा आजी माजी ग्रा. सदस्यांचा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा, तसेच पाडळी, केसे, आबाईनगर, सुपने, वसंतगड, साकुर्डी, बेलदारे म्होप्रे, विहे, तांबवे, किरपे, उ.तांबवे,गमेवाडी, साजुर, भोळेवाडी डेळेवाडी, आरेवाडी, मलहारपेठ विभाग, नवारस्ता, मोरगिरी विभाग, पाटण विभागतील अनेक हिंदुत्ववादी आणि हिंदू एकतेच्या कार्यकर्त्यांची आणि हितचिंतकांची साथ मिळाली.


या विभागात ,तालुक्यात स्वतःची वेगळी image, स्वतःची पत निर्माण करण्यास संघटनेची मदत झाली,परंतु ही तयार झालेली ओळख संघटनेच्या कामासाठी,हितासाठीच वापरणार हे मात्र नक्की.संघटनेची ताकद एखादया सामान्य कार्यकर्त्याला किती मोठं करू शकते हे मी नक्कीच अनुभवलंय. इथून पुढच्या काळात संघटनेचे काम प. महाराष्ट्र अध्यक्ष विनायकराव पावसकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, हिंदुधर्मरक्षक अजय पावसकर, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल यादव, उपजिल्हाध्यक्ष रुपेश मुळे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, मी म्हणून संघटना आहे. असे न करता संघटना आहे म्हणून मी आहे. याबद्दलची जाणीव मनात ठेवून धर्माचे हिंदुत्वाचे, सामाजिक काम प्रामाणिकपणे पार पाडून पाटण तालुक्यात हिंदुत्वाचा झंझावात उभा करणार व भगव्याची आणि छत्रपतींच्या कार्याला साजेशी अशी तरुण पिढी तयार करायचे काम करणार अशी प्रबळ इच्छा आहे.


तुषार उर्फ गणेश पाटील
तालुकाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, पाटण.