कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव राज्यपातळीवरील 'उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्काराने सन्मानित


कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव राज्यपातळीवरील 'उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्काराने सन्मानित


कराड - सहकारी बँकांची शिखर मार्गदर्शक संस्था म्हणून गेल्या ८० वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनकडून दिला जाणारा राज्यपातळीवरील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


महाराष्ट्र राज्यातील दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांमधील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी, चेअरमन, संचालक व कार्यकर्ते यांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनकडून दरवर्षी हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. सीए,दिलीप गुरव यांनी कराड अर्बन बँकेची मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा स्विकारली तेव्हा बँकेचा व्यवसाय रू.५५० कोटी इतका होता. तो आज जवळपास रू.४५०० कोटी पर्यंत पोहचला आहे. बँकेच्या एकंदर कामकाज प्रणालीत व कार्यपद्धतीत अमुलाग्र सुधारणा करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीत अर्बन बँकेमध्ये तीन बँकांचे विलिनीकरण यशस्वी झाले आहेत. बँकेला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बँकिंग बरोबरच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय
सहभाग असतो. 


१९९६ पासून अर्बन बँकेच्या माध्यमातून सीए.दिलीप गुरव कार्यरत असून त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा २००५ मध्ये स्विकारली. गेल्या पंधरा वर्षामध्ये बँकेच्या प्रगतीला निश्चित दिशा व गती दिली आणि त्यांच्या व्यवसायिक ज्ञानाचा उत्तम लाभ बँकेच्या वाटचालीत झाला असे गौरवोद्गार बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी काढले. उत्तम नियोजनाच्या बळावर त्यांनी यशाचे अनेक टप्पे सहज ओलांडले आहेत. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कष्टपूर्वक योगदानाचा व वाटचालीचा यथोचित गौरव आहे, असे अर्बनकुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले. दिलीप गुरव हे अर्बनकुटुंबाचेच मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांचे कार्य गौरवास्पद असल्याचे बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले. 


कराड अर्बन बँक हे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक म्हणून लौकिक प्राप्त झाली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी अथक परिश्रम करून संचालक मंडळाच्या सूचनेनुसार पारदर्शक कारभार करून ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक, सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. दिलीप गुरव यांनी अर्बन बँकेमध्ये केलेल्या प्रामाणिक, पारदर्शक, स्वच्छ कारभारामुळेच त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. दिलीप गुरव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.कराड अर्बन बँक म्हणजे कराडच्या वैभवात भर घालणारे "बँक" म्हणून कराडकरांना अर्बन बँकेचा अभिमान आहे. कराड अर्बन बँकेने समाजातील तळागाळातील लघु-मध्यम व्यवसायिकांना कर्जपुरवठा करून आर्थिक पाठबळ दिल्यामुळेच अनेक व्यवसायिक स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहिले आहेत