सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील अत्याधुनिक शल्यचिकित्सा विभागाचा विस्तार कुशल शल्य चिकित्सक व लप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा रूग्णांना होणार फायदा


सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील अत्याधुनिक शल्यचिकित्सा विभागाचा विस्तार कुशल शल्य चिकित्सक व लप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा रूग्णांना होणार फायदा


कराड - अद्ययावत तंत्रज्ञान,तज्ञ डॉक्टर्स आणि सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा पुरविण्याच्या आपल्या ध्येयाअंतर्गत सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आपल्या अत्याधुनिक शल्यचिकित्सा विभागात आता प्रदीर्घ अनुभव असलेले कुशल शल्यचिकित्सक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.त्यांनी आजवर 20,000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या असून त्यामध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया,लेझर शस्त्रक्रिया,बेरियाट्रिक शस्त्रक्रिया व अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.ही माहिती सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.


यावेळी सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मार्केटिंग हेड डॉ.केतन आपटे, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराड चे प्रमुख डॉ.व्यंकटेश मुळे, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराड चे डायरेक्टर श्री दिलीपभाऊ चव्हाण व श्री अमित चव्हाण, शल्यचित्सिक डॉ.नितीन नांगरे उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराड चे प्रमुख डॉ.व्यंकटेश मुळे म्हणाले की,डॉ.नितीन नांगरे यांचे आम्ही सह्याद्रि हॉस्पिटलच्या परिवारात स्वागत करतो.सह्याद्रि हॉस्पिटलच्या शल्यचिकित्सा विभागात असलेल्या अद्ययावत सुविधांशी कुशल शल्यचिकित्सक असलेले डॉ.नांगरे जोडले जाणे हे रूग्णांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.यामुळे डॉ.नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या अनेक शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी),हर्निया,अपेंडिक्स,पिशवी, काढणेपित्ताशय,प्लीहा,लॅप्रोक्टॉमी अशा अनेक शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा विभागात होऊ शकतात. सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये या सर्व शस्त्रक्रियांना सहाय्यक आणि पूरक ठरतील अशा सर्व अद्ययावत सुविधा व उपकरणे,ऑपरेशन थिएटर्स उपलब्ध आहेत.बिनटाक्याच्या शस्त्रक्रियांना अद्ययावत सुविधांबरोबरच डॉक्टरांचे कौशल्य महत्त्वाचे ठरते आणि म्हणूनच डॉ.नांगरे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सर्वांना फायदा होईल.


याप्रसंगी बोलताना शल्यचित्सिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.नितीन नांगरे म्हणाले की, हॉस्पिटल्सची महाराष्ट्रातील आघाडीची साखळी असलेल्या सह्याद्रि हॉस्पिटल्स परिवाराशी जोडले जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.येथे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसह सर्व शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या  सोयीसुविधा उपलब्ध असून एकाच छताखाली रूग्णांना निदान व उपचाराशी निगडीत सर्व सेवा मिळू शकतात.लॅप्रोस्कोपिक किंवा बिनटाक्याच्या शस्त्रक्रियांमुळे रूग्णाला कमी दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते त्यामुळे उपचाराचा खर्च देखील कमी होऊ शकतो आणि दैनंदिन जीवन लवकर पूर्ववत होते.कमी रक्तस्त्राव,कमी वेदनेसह याचे आणखी अनेक फायदे आहेत.लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानासह पोटातील वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचता येते आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया देखील करता येते.त्यामळे कराड व आसपासच्या परिसरातील रूग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज नसून सर्व आरोग्य सेवा सविधा येथेच उपलब्ध होत आहेत. डॉ.नांगरे दररोज सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असतील.


सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या कार्यकारी संचालिका डॉ.जयश्री आपटे म्हणाल्या की.गेल्या काही वर्षात का शहराची प्रगती झपाट्याने होत असून वैद्यकीय केंद्र म्हणून एक नवी ओळख ही शहराला प्राप्त होत आहे.यांत सह्याद्रि हॉस्पिटल्सचा महत्त्वाचा वाटा आहे.अद्ययावत सुविधा,समर्पित डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्या साहाय्याने अनेक आजारांसाठी एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सेवा आम्ही सातत्याने रूग्णांना पुरवित आहोत.विविध जागरूकता, कार्यक्रमआरोग्यसेवा उपक्रम याद्वारे आम्ही आमचे कार्य पुढील काळात अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करू.