श्री सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचा आवाज वाजणार
कराड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या श्री सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसाठी गडप्रेमी श्री सुभाष भिमराव सुर्वे यांनी 5 हजार रूपये देणगी दिली. या देगणीसह अन्य गडप्रेमींच्या सहकार्याने सुमारे 13 हजार 999 हजार रूपयांचा वायरलेस ट्राँली स्पिकर आणण्यात आला आहे.
किरण मोबाईल शाँपीचे मालक व शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य शंकरराव हराळे यांनी हा स्पिकर यांनी हा स्पिकर 9 हजार रूपयांना दिला असून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला मोलाचे सहकार्य केले आहे. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ सुभाष एरम, रश्मी एरम यांच्यासह उमेश डुबल, पार्थ बेसुळके, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, चंद्रजित पाटील, आनंदराव गुरव यांच्यासह गडप्रेमींच्या उपस्थित श्रीफळ वाढवून स्पिकर सुरु करण्यात आला. या सहकार्याबद्दल सुभाष सुर्वे, गडप्रेमी नागरिक तसेच शंकरराव हराळे यांचे सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान आभारी आहे.