माजी नगराध्यक्ष, माजी दोन नगरसेवकांसह ३५० अतिक्रमणांवर हातोडा......जेसीबीच्या साह्याने कराडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे सुरू


माजी नगराध्यक्ष, माजी दोन नगरसेवकांसह ३५० अतिक्रमणांवर हातोडा......जेसीबीच्या साह्याने कराडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे सुरू


कराड - अतिक्रमण मोहिमेमध्ये एकूण साडेतीनशे अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये माजी नगराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांची अतिक्रमण हटवण्यात आले. टपरी, चहाचे दुकान, हातगाडा, फळ विक्रेत्यांचे गाडे, होल्डिंगचे मोठे फलक, वाढीव पायऱ्या, कट्टे, खाजगी जागेत चायनीज दुकान, मटणाचे दुकान, ऑफिस, झोपड्या, वडापावचे गाडे, व्यवसायिक गाळ्यासमोरील अतिरिक्त पत्र्याचे शेड यासह  जे अतिक्रमण आहे ते मोठ्या प्रमाणात आज हटवण्यात आले. दत्त चौकातून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली. एसटी स्टँड परिसर, शाहू चौक, पोपटभाई पेट्रोल पंप चौक, मार्केट यार्ड येथील अतिक्रमणे हटविण्यात आली. 1991 साली मोठ्या प्रमाणात कराडमध्ये अतिक्रमण मोहीम राबवली, यानंतर 2020 ची ही सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम सुरू झाली असून 27 फेब्रुवारी रोजी ही मोहीम सुरू राहणार आहे असे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.


गेल्या अनेक वर्षापासूनची कराड बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणीवर बुधवारी सुरुवात करण्यात आली. कराड नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने दत्त चौक ते विजय दिवस चौक या परिसरातील शेकडो अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवली. त्यामुळेच कराड बसस्थानक परिसराने मुक्त श्वास घेतला. व्यापक अतिक्रम हटाव मोहिमेचा धसका अतिक्रमणधारकांनी घेतला असून काल रात्रीपासूनच विक्रेत्यांनी आपली अतिक्रमणे काढून देण्यास प्रारंभ केला होता.


हातगाडा व्यवसायिकांची मनमानी, दुकानदारांची फुटपाथवर अतिक्रमणे यामुळे कराड शहर विशेषत: बसस्थानक परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. मागील महिन्यात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांनी पुढाकार घेत नगरपालिका पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांच्याबरोबर अतिक्रमणे हटविण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर महिनाभर कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे अतिक्रमणे काढणार कि नाही ? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. छोट्या टपऱ्यांवर जेसीबीचा तडाका बसताच टपरी धारकांच्या डोळ्यात अश्रू आले. आपला रोजीरोटीचा उदरनिर्वाहाचा सहारा कायमचा गेल्यामुळे अनेकांनी सद्गदीत होऊन आता पुढे काय करायचे ? असा प्रश्न उपस्थित केला.


कराड बस स्थानकासमोर पार्किंगची इमारत नगरपालिकेतर्फे बांधण्यात येणार आहे. या जागेवर असणारी अतिक्रमणे आज जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आली. या परिसरातील टपऱ्या, दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. पार्किंग इमारतीसाठी राज्यशासनाने तीन कोटीचा निधी दिला आहे मात्र या अतिक्रमणांमुळे सदर इमारतीचे काम रेंगाळले होते. बस स्थानकाचा फुटपाथ विक्रेत्यांनी व्यापलेला होता मात्र, नगरपालिकेच्या मोहिमेची चाहूल लागल्याने त्यांनी अतिक्रमणे काढून घेतली. शहरात अतिक्रमण मोहिमेची मोठ्या प्रमाणात चर्चा असून नगरपालिकेने केलेल्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे. अतिक्रमणांमुळे "स्वच्छ व सुंदर कराड" शहराचा सौंदर्यात बाधा येत होती. त्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली जात होती. 


अखेर बुधवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगर अभियंता ए. आर. पवार, पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका तसेच पोलिस दलाचे शेकडो कर्मचारी या अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले. कारवाई सकाळी साडे आठच्या सुमारास सुरू करण्यात आली.एसटी स्टँड परिसराबरोबरच कराड शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे दिसून येत होती मात्र, यावर नगरपालिका प्रशासन कारवाई करीत नव्हती.


मोहीम कायम राहणार का ?
सदरचे अतिक्रमण मोहीम ही तात्पुरती करणार का ? पुन्हा अतिक्रमणे वाढणार नाहीत यासाठी काय करणार ? अतिक्रमण होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे का ? असे प्रश्न विचारले जात होते.


टपरी धारकांचे आलिशान बंगले
टपरीचे तोडकेमोडके साहित्य गोळा करून अतिक्रमणधारक डोळे भरल्या अश्रुनी गाडीमध्ये भरून घेऊन जात होते.पार्किंग जागेवर असणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे असे बोलले जात होते. दरम्यान प्रत्येक टपरीधारकांचे आलिशान बंगले आहेत अशी चर्चा सुरू होती.


इमारतींचे अतिक्रमणांचे काय ?
रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे कराड शहरात अनेक इमारतींचे बेकायदेशीर बांधकाम झाले आहे. त्या अतिक्रमणांवर नगरपालिका प्रशासन केंव्हा हातोडा घालणार ! बड्या आसामींचे अतिक्रमण हटवताना नगरपालिका का कचरते ? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश