प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद - राज्यमंत्री शंभूराजे देसाई


प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद - राज्यमंत्री शंभूराजे देसाई


कराड - पंचायत समिती कराड शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिक्षण महोत्सव राज्यात रोड माँडेल ठरला आहे.सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा डिजिटल होऊन विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. असे प्रतिपादन वित्त व ग्रह राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.


पंचायत समिती कराडच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या पाचव्या शिक्षण महोत्सवात भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सदस्य रमेश चव्हाण, अँड शरद पोळ,गटविकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, महाबळेश्वर गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे,शालेय पोषण आहार अधिकक्षक विजय परीट शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत निकम,जमिला मुलाणी ,केंद्रप्रमुख विलास पाटील, निवास पवार, सदाशिव आमणे,हणमंत काटे, हणमंत पवार,धामवाडकर याची उपस्थिती होती.


राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शहरातील शाळाप्रमाणे ग्रामीण भागातील शाळाही दर्जेदार होण्यासाठी शाळांमध्ये ईलरंनिगचे साहित्य दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी अष्टपैलूत्वाचे गुण असतात.


यावेळी जि.प.सदस्य प्रदीप पाटील म्हणाले, कराड शिक्षण महोत्सवात शिक्षकांनी झोकून देऊन काम केले आहे. महोत्सवात उभारण्यात आलेले विविध सहशालेय उपक्रमाचे,ज्ञान रचना वादाचे साहित्य यामुळे विद्यार्थी गुणवत्ता वाढ झालेली आहे. प्राथमिक शाळातील शिक्षण दर्जेदार झाले आहे.


प्रास्ताविक आनंद पळसे स्वागत गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर ,सत्रसंचलन अंनत आघाव, विजय गवळी यांनी केले व आभार जमिला मुलाणी यांनी मानले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती