"कृष्णा" मध्ये अद्ययावत पेसमेकरची रोपण प्रक्रिया यशस्वी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच उपचार; हृदयविकारग्रस्त रूग्णांसाठी वरदान


"कृष्णा" मध्ये अद्ययावत पेसमेकरची रोपण प्रक्रिया यशस्वी........पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच उपचार; हृदयविकारग्रस्त रूग्णांसाठी वरदान


कराड - कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात अद्ययावत पेसमेकरची यशस्वी रोपण प्रक्रिया पार पडली. अतिशय गुंतागुंतीची समजली जाणारी रोपण प्रक्रिया पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली असून, हृदयविकारग्रस्त रूग्णांसाठी ही उपचार प्रणाली वरदान ठरणार आहे.


या रूग्णाची तपासणी करणारे डॉ. राहुल पाटील यांनी कृष्णा हॉस्पिटलचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्याशी सल्लामसलत केले असता, डॉ. शेळके यांनी रूग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून सीआरटी या महागड्या उपचारपद्धतीऐवजी नवीन पद्धतीने अद्ययावत पेसमेकर बसविण्याचे ठरविले. त्यानुसार बंडल ऑफ हीस पेसिंग म्हणजेच अद्ययावत पेसमेकरची रोपण प्रकिया यशस्वीपणे करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये ईपी सिस्टिमच्या सहाय्याने प्रथम हृदयाचा नैसर्गिक विद्युतप्रवाह मार्ग शोधला जातो आणि त्यानंतर तिथे पेसमेकर वायरचे लीड रोपण केले जाते. ज्यामुळे नैसर्गिक विद्युत प्रवाह मार्ग प्रवाहित  होतो आणि हृदयाचे ठोके सामान्य होतात.


हृदयाचा अनुवांशिक आजार असलेला आणखी एक रूग्णदेखील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात दाखल झाला होता. अनुवांशिक आजारामध्ये हृदयाचे खालचे कप्पे आणि रक्तवाहिनी यांची अदलाबदल झालेली असल्याने अशा रूग्णांवर उपचार करणे अत्यंत गुंतागुंतीचे व जोखमीचे असते. मात्र अशा रूग्णावरही अद्ययावत पेसमेकरची यशस्वी रोपण प्रक्रिया करून या रूग्णाच्या हृदयाचे ठोके सामान्य करण्यात डॉ. शेळके यांना यश मिळाले. कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणखी एका रूग्णावरही ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.        


डॉ. अभिजीत शेळके म्हणाले, अद्ययावत पेसमेकर बसविण्याच्या उपचार पद्धतीचा पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच वापर करण्यात आला असून, यासाठी इको विभागातील डॉ. रमेश कवडे यांच्यासह ऑपरेशन विभागातील तज्ज्ञ स्टाफ व नर्सिंग स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले. गरजू रूग्णांसाठी ही उपचार प्रणाली वरदान ठरणार आहे. 


Popular posts
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image