कराड नगरपालिकेची प्लास्टिक वेचा मोहीम


कराड नगरपालिकेचे प्लास्टिक वेचा मोहीम


कराड - कराड नगरपरिषदमार्फत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्लास्टिक वेचा मोहीम राबविण्यात आली. कर्मचारयांमार्फत प्रबोधन करण्यात आले तसेच प्लास्टिक जप्त करण्यात आले. प्लास्टिक वेचा मोहीमे अंतर्गत १५ किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे.


कराड नगरपरिषदेचे कर्मचारी तथा अधिकारी वर्ग यांनी प्लास्टिकचे तोटे आणि त्यावर निर्बंध घालण्यासंदर्भात शहरात विविध ठिकाणी मार्गदर्शन करत प्लास्टिक वेचण्याची मोहीम राबविली. त्यामध्ये शहरातील शाळा, महाविद्यालय, व्यापारी वर्ग, स्वच्छता दूत, नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. 


कराड नगरपरिषद मार्फत राबविण्यात आलेले कार्यक्रमांची स्थळे - जनकल्याण शाळा, प्रेमलाताई पोलीटेक्निक, कॉटेज हॉस्पिटल, संत सखुबाई मंदिर, कमलेश्वर मंदिर येथे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत एस टी स्टेंड. क्रांती रिक्षा स्टेंड, स्टेंड जवळील हॉटेल परिसर, प्रभात टोकीज, कृष्णा नदी घाट परिसर, प्रीतीसंगम उद्यान, कृष्णा नका ते विजय दिवस चौक पदपथ, छ. शिवाजी भाजी मंडई पासून मुख्य बाजारपेठ परिसरात सदरची मोहीम राबविण्यात आली.


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image