आम्ही भाग्यवान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या कवड्याच्या माळेचे दर्शन

 आम्ही भाग्यवान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या कवड्याच्या माळेचे दर्शन


कराड - जयवंत काँलेज इंजिनिअरिंग अँन्ड मँनेजमेंटमध्ये शिवमहोत्सव संपन्न झाला. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ. अतुल भोसले, प्रमुख सल्लागार प्रा विनोद बाबर, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितलताई मालुसरे, इतिहास अभ्यासक प्रा. अरूण घोडके, शिवकालीन शस्त्र संग्रहक गिरीशराव जाधव, प्राचार्य डॉ.बी.एस.साळुंखे उपस्थितीत होते.


किल्लेमच्छिंद्रगड, सदाशिवगड संवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने केलेल्या कार्याची दखल घेत सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, राहुल जाधव, उमेश भोसले, नरेंद्र मुळीक, सचिन माने, चंद्रजित पाटील यांनी ऐतिहासिक कवड्याच्या माळेचे दर्शन घेतले. शितलताई मालुसरे यांच्या हस्ते आणि प्रा. अरूण घोडके यांच्या हस्ते गौरव झाल्यावर शितलताई मालुसरे यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक कवड्याच्या माळेचे जवळून दर्शन घेता आले. तसेच तानाजी चित्रपटाच्या निर्मितीमधील अडथळे आणि त्यावर मात करताना झालेली कसरत शितलताई मालुसरे यांच्या तोंडून ऐकता आली. 


कवड्याच्या माळेचा इतिहास...


नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे.
तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज शिवराज मालुसरे होते. डॉ. शीतल त्यांच्या पत्नी आहेत. त्या महाड येथे राहतात. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर पीएचडी केली आहे. सासूबाईंनी ही माळ वंशपरंपरेने त्यांच्याकडे सुपूर्त केली होती.


राजेशाही थाटातील माळ 


मालुसरे कुटुंबीयांकडे असलेली आणि शिवाजी महाराजांचे आभूषण असलेली कवड्यांची ही माळ दोन पदरी असून अतिशय सुरेख आहे. दोऱ्याला चोहोबाजूंनी समुद्रात आढळणाऱ्या कवड्या गुंफल्या आहेत. ती माळ पाहताच राजेशाही थाट दिसतो.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image