सिद्धेश्वर यात्रेत कापडी पिशवी वाटप केंद्राचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन


सिद्धेश्वर यात्रेत कापडी पिशवी वाटप केंद्राचेरा संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन


लातूर, - राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्लास्टिक पिशवीथर्माकोलमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाच्या सचित्र मार्गदर्शिका व कापडी पिशवी वाटप केंद्राचे सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूरच्या उपप्रादेशिक कार्यालयाच्यावतीने प्लास्टिकबंदीथर्माकोलमुक्ती व समृद्ध पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्याकरिता सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.


या केंद्राच्या माध्यमातून प्लास्टिक बंदीबाबत जास्तीत जास्त जागृती करण्याकडे संबधितांनी लक्ष द्यावे. तसेच नागरिकांनीही शासनाच्या या मोहिमेस प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करून सहकार्य करावे व पर्यावरण संरक्षण अभियानात खारीचा वाटा उचलावा असे आवाहन राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी व्ही.पी. शेळकेक्षेत्र अधिकारी रविंद्र क्षीरसागरएन.पी. दारसेवाडशितल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image