पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे नूतनीकरण


पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे नूतनीकरण


पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डाॕ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले.यावेळी त्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.आमचा उत्साह वाढविला.आपल्या कारकिर्दीत एक चांगले काम आपल्या हातून झाले, याचे समाधान वाटले.


नागपूरला जिल्हा माहिती अधिकारी असताना 'डीपीसी'मधून कार्यालयाचे नूतनीकरण झाले.सुसज्ज कार्यालयाबरोबरच उत्तम स्टुडिओ उभारता आले.नूतनीकरण झालेले हे आमचे महाराष्ट्रातील पहिले जिल्हा कार्यालय होते.त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रविण दराडे आणि संचालक कौसल साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


२०११-१२ मध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पुण्याला बदलून आलो.आल्या आल्या तेथेही कार्यालय नूतनीकरणाचे काम हाती घेतले.अर्थात 'डीपीसी'तून निधी मंजूर होताच...!नंतर एका वर्षातच उपसंचालक पदावर पदोन्नतीने दिल्लीला बदलून गेलो.तेथेही कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावरच्या नूतनीकरणाचे काम माझ्या कारकिर्दीत झाले.


तात्पर्य असे की,माणसाने काही तरी नवनवीन करत राहिले पाहिजे.आपल्या सहका-यांना विश्वासात घेऊन कुठलेही काम हाती घेतले तर निश्चित सिध्दीस जाऊ शकते.


नागपूरला असताना अनेक नवनवीन प्रयोग करता आले.'न्यूज बुलेटिन' हे आगळेवेगळे बातमीपत्र सुरू केले.माहिती पट, जिंगल्स लघुपटाची निर्मिती केली.अर्थात हे सारे आपल्या सहकार्यामुळे! मी फक्त निमित्त होतो.आपण फक्त दिशा देण्याचे काम करतो.प्रत्यक्षात काम त्यांनाच करावे लागते.यासाठी जिल्हा माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, सहाय्यक संचालक, माहिती सहाय्यक, कॕमेरामन, छायाचित्रकार व अन्य कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो.


आपण जेव्हा एखादी मोहीम हाती घेतो,त्यावेळी सर्व सहकारी एकदिलाने काम करतात,त्यामुळेच ते यशस्वी होते.'आषाढी वारी'च्यावेळी जेव्हा 'संवाद वारी'उपक्रम राबविला, तेव्हा सर्वांनीच जीव ओतून काम केले.


पुण्याचे नूतनीकरण झालेले हे पहिले विभागीय माहिती कार्यालय आहे.२०११-१२ मध्ये पुणे जिल्हा माहिती कार्यालयाचे काम सुरू असताना तत्कालीन उपसंचालक वर्षा शेडगे मॕडम यांच्याकडे नूतनीकरणासाठी मुख्यालयाकडे निधी मागण्यासाठी आग्रह धरला होता .नंतर सहाय्यक संचालक युवराज पाटील आणि मी ..सां.बां.विभागातकडून इस्टिमेट करून घेतला होता. नंतर विभागाने निधी उपलब्ध करून दिला.शेवटी आपल्या कारकिर्दीत हे काम झाले,याचे समाधान वाटणे स्वाभाविक आहे.


मोहन राठोड, उपसंचालक, 
विभागीय माहिती कार्यालय, पुणे