प्राध्यापक अशोक कुंभार यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त 


प्राध्यापक अशोक कुंभार यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त 


कराड -  शिरसगाव (ता.कडेगांव जि. सांगली) येथील  प्राध्यापक अशोक रघुनाथ कुंभार सध्या   भारती विद्यापीठाच्या  फार्मसी कॉलेज मध्ये कार्यरत असून त्यांनी जे.जे. टी यू.  विद्यापीठ राजस्थान मधून फार्मसी (औषधंनिर्माणशास्त्र ) या विषयाअंतर्गत "फॉर्म्युलेशन कॅरेक्टरायजेशन अँड ईव्यालुशन ऑफ अराईल असेटीक ऍसिड  डेरीवेटीव्ह फॉर कोलॉन टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम "हा विषय प्रबंधासाठी सादर केला . त्यांना डॉ. राकेशकुमार जाट  (सर) यांचे मार्गदर्शन लाभले .


याबदल भारती  विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती  डॉ.शिवाजीराव कदम सर , नामदार  डॉ.विश्वजीत कदम ,  सहकार्यवाह डॉ.  के .डी जाधव ,प्राचार्य डॉ.एच एम कदम  तसेच   लशिक्षक,शिक्षकेत्तर वर्ग,सेवक वर्ग आदींनी अभिनंदन केले. एकव्यासंगी प्राध्यापक म्हणून  शिक्षण क्षेत्रात कुंभार सरांची ओळख आहे . त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात   उच्च पदस्थ अधिकारी  म्हणून कार्यरत आहेत .सरांचा प्रवास  ग्रामीण भागातून येऊन  विद्येचे माहेरघर पुणे येथे चालू झाला. संघर्षातून,जिद्दीने,चिकाटीने यशाला गवसणी घालण्यात त्यांना यश आले.त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image