शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन चरित्राची पुस्तके उपलब्ध


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन चरित्राची पुस्तके उपलब्ध 


कराड - सौ.वेणूताई चव्हाण ट्रस्टमध्ये कराड शहरासह तालुक्यातील विद्यार्थी अभ्यासकेसाठी दररोज येत असतात.विविध विषयावरील पुस्तके विद्यार्थ्यांना येथे उपलब्ध करून दिली जातात दरम्यान विद्यार्थी अभ्यासिकेला महाराष्ट्र वितरक सेनेचे राज्याध्यक्ष मारुतीराव साळुंखे यांनी सदिच्छा भेट दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तके अभ्यासिकेमध्ये असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.


अभ्यासिकेतील विद्यार्थीनी ग्रंथालयामध्ये शिवसेना आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराविषयीची माहीती पुस्तके, जीवन चरित्रबाबत ग्रंथ अभ्यासण्यासाठी उपलब्ध असावीत अशी विनंती मारुतीराव साळुंखे यांच्याकडे केली होती. त्यांनी लगेच पुस्तके देण्याचे विद्यार्यांना वचन दिले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पुस्तके अभ्यासिकेसाठी शिवसेना भवन(मुंबई) येथून शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष जोतिराम साळी यांच्याकडे पुस्तके दिली.


शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनासंदर्भाने उपलब्ध असणारी सर्व पुस्तके शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, शिवसेना कराड दक्षिण तालुका प्रमुख नितीन काशिद-पाटील, कराड तालुका प्रमुख शशिकांत हापसे, शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष जोतिराम साळी, शिवसेना कराड शहर प्रमुख शशिराज करपे यांच्या हस्ते अभ्यासिकेचे व्यवस्थापक आणि विद्यार्थी यांच्याकडे पुस्तके देण्यात आली.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image